HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

पर्रिकरांच्या मृत्यूनंतर अशी विधाने करणे योग्य नाही, मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका

मुंबई | राफेल डील प्रकरणी तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देवून गोव्यात परतले असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. पर्रिकरांच्या मृत्यूनंतर अशी विधाने करणे योग्य नसल्याचा आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे.

पुढे मुख्यमंत्री असे देखील म्हणाले की, ‘राहुल गांधी यांनीही याआधी असेच काहीसे बोलण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी मनोहर पर्रिकर जिवंत होते आणि त्यांनी राहुल यांच्या विधानावर योग्य ते उत्तर देखील दिले होते. परंतु आता एखाद्याच्या मृत्यूनंतर असे वक्तव्य करणे अयोग्य आहे, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे कर्करोगाच्या दीर्घ उपचारानंतर निधन झाले. मृत्यूपूर्वी देखील ते आपल्या कामा प्रतिप्रामाणिक होते. मृत्यूच्या आठ दिवस पूर्वी त्यांनी मला मोदींसाठी दोन प्रचारसभा करण्याची संधी मिळायला हवी, अशी इच्छा व्यक्त केली होती. कारण मोदींसारखा पंतप्रधान पुन्हा होणे नाही, असे पर्रिकर म्हणाले होते. परंतु आज त्यांच्या मृत्यूनंतर राजकीय लाभ घेण्यासाठी त्यांचा वापर करणे योग्य नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

नेमके शरद पवार यांनी पर्रिकरांबद्दल काय बोलेले

कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राफेल करारावरून केंद्र सरकारवर टीका केली. यावेळी राफेल खरेदी प्रकरणात व्यावहारात गैरप्रकराची तक्रार झाली आहे. विमानांच्या किंमती तीन वेळा बदलण्यात आल्या. हा सर्व व्यवहार तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना पटला नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि गोव्याचे मुख्यमंत्री होणे पसंद केले, असे शरद पवार म्हणाले होते.

Related posts

आमच्या सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर विठ्ठल प्रसन्न म्हणूनच…!

News Desk

युतीसाठी भाजपकडून मनसेची मनधरणी ?

News Desk

पंतप्रधान मोदी देशासाठी नव्हे तर निवडक उद्योजकांसाठी काम करतात !

News Desk