HW News Marathi
राजकारण

गोवा भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

पणजी| गोव्यातील लोकसभा निवडणुका व दोन विधानसभा मतदारसंघंतील पोटनिवडणुकीमुळे भाजप पक्षातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. पक्षा अंतर्गत वाद होऊ नये होणे योग्य नाही असे पक्षांच्या काही पदाधिकार्यनाचे मत आहे. हा वाद लोकांसमोर उघडपणे आल्याने आता भाजपचे संघटन मंत्री विजय पुराणिक व इतरांनी मिळून हे भांडण मिटविण्याचा प्रयत्न करत आहेत.

पुर्वी कोणत्याही पक्षा-पक्षांमध्ये वाद किंवा भांडण झाल्यास मुख्यमंत्री मनोहर परिकर हे अशी भांडणे मिटवण्याचापर्यंत करत असे आणि पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांचा आदेशाचे पालन करत असे. परंतु मुख्यमंत्री काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे सध्या ते आराम करत आहेत. पर्रिकर त्यांच्या निवासस्थानीच असल्याने ते कोणाशीच सवांद साधू शकत नाही, अश्यावेळी माजी मुख्यमंत्री तसेच ज्यष्ठ भाजप नेते लक्ष्मीकांत पार्सेकर हे आक्रमक झाले आहेत.

पार्सेकर हे गोवा भाजपचे संस्थापक सदस्य असून काँग्रेसमधील आमदार फोडून भाजपमध्ये आणण्याच्या कृतीबाबत माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. गोवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनीही भाजपमधील सध्याच्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तब्बल ४ वर्षांनंतरही परळी-धायगुडा राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था कायम

News Desk

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाने देशाला नवी दिशा मिळाली !

News Desk

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

swarit