मुंबई | अमेरिकेकडून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांची माहिती देणाऱ्याला ३५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या हल्ल्यात अमेरिकेच्या सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभुमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी हे बक्षीस जाहीर केले आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज(नोव्हेंबर)ला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु या दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह पूर्ण राज्यभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
The Department of State Rewards for Justice (RFJ) Program is offering a new reward for up to $5 million for information leading to the arrest or conviction of any individual who was involved in planning or facilitating 2008 Mumbai attack: US Secretary of State Mike Pompeo pic.twitter.com/5oN43VAJEz
— ANI (@ANI) November 26, 2018
या हल्ल्याचे मुख्य सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना पकडण्यासाठी अमेरिकेकडून ३५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच, अमेरिकेकडून या हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री समुद्रामार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता. या दहशतवाद्यांनी ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाउस, हॉटेल ओबेरॉय, सीएसएमटी, कामा रुग्णालय या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यामध्ये ३४ परदेशी नागरिकांसह १६६ नागरिकांना प्राण गमवावा लागला, तर सुमारे ७०० जण जखमी झाले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.