HW News Marathi
राजकारण

यंदा वरळीत हिंगणघाट जळीत कांडातील आरोपीच्या पुतळ्याची होळी

धनंजय दळवी | होळी अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे. तर मुंबईत वरळी येथील होळी पाहण्याजोगी असते. या दिवशी मोठ्या जल्लोषात लोक होळीचा आनंद साजरा करताना दिसून येतात. तर मुंबईतील वरळी येथील बी.डी.डी चाळ येथील होळी पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने गर्दी करतात. तसेच प्रत्येक वेळी या चाळीकडून विविध प्रकारच्या पद्धतींची होळी उभारण्यात येते. गतवर्षी पब्जी गेम आणि पुलवामा दहशतावदी हल्ल्यातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर ह्याची होळी उभारली होती.

वरळी येथील बी.डी.डी चाळ क्र. ७६/७७ मधील श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी यंदाच्या होळीच्या निमित्ताने हिंगणघाट येथे शिक्षिकेला जळणाऱ्या नराधम आरोपीची होळी तयार केली जात आहे. यामध्ये आरोपीचा पुतळा तयार करून होळी जाळली जाणार आहे. भारतातील सर्वात उंच होळी म्हणून वरळीत पाहिलं जातं. या होळीची उंची ५५ ते ६० फूट इतकी असते. तसेच गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरणाऱ्या या मंडळाची यंदाची होळी म्हणून सोमवारी ९ मार्च रोजी रात्री ठिक 12 वाजता जाळ्यात येणार आहे. सध्या या होळीची जय्यत तयारी वरळीत सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने भोसरी MIDC मधील धक्कादायक प्रकार आणला उघडकीस

News Desk

मी हेमंत करकरे यांना म्हटले होते की त्यांचा सर्वनाश होईल !

News Desk

भाजप कडून बलात्का-यांची पाठराखण | राज ठाकरे

News Desk