HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

सत्ताधारी नेते इतिहास बदलतील यात जराही शंका नाही म्हणूनच…!

मुंबई | “सद्यस्थिती पाहिल्यानंतर सत्ताधारी नेते आपला इतिहास बदलतील याबाबत मला जराही शंका नाही”, असे उपहासात्मक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. पंढरपूरमध्ये भारत भालके यांच्या प्रचारसभेत शरद पवार बोलत होते. यावेळी, शरद पवार यांनी भाजपवर टीका करताना हा उपहासात्मक टोला लगावला आहे. “सत्ताधारी भाजपचे नेते इतिहास बदलतील याबाबत माझ्या मनात जराही शंका नाही. म्हणून, आता त्यांना सत्तेपासून दूर ठेवायला हवे”, असा टोला शरद पवार यांनी भाजप सरकारला लगावला आहे. त्याचप्रमाणे, हे सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला.

“राज्य सरकारने अरबी समुद्रात ३ वर्षांत शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, गेल्या ५ वर्षांत काहीही काम झाले नाही. आता गड-किल्ल्यांवर दारूचे अड्डे आणि डान्सबार सुरू करण्याचा घाट घातला जातो आहे. आपल्या इतिहासाच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपच्या नेत्यांनी आश्वासनांशिवाय दुसरे काहीही दिले नाही. राज्यातील ही सद्यस्थिती पाहता उद्या हे सत्ताधारी नेते आपला इतिहासही बदलतील याबाबत मला माझ्या मनात शंका नाही. म्हणूनच, त्यांना सत्तेपासून दूर ठेवायचे आहे”, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

Related posts

तेजस ठाकरेंच्या राजकीय एन्ट्रीबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले

News Desk

मी सर्वात जास्त जमीन खरेदी केली ही केवळ अफवा | राजू शेट्टी

News Desk

…तरीही वरिष्ठ नेत्यांना पराभवाची जबाबदारी स्वीकारावीशी वाटली नाही !

News Desk