HW News Marathi
राजकारण

चेंबूरमधील मैदानाला दिवंगत बाबुराव शेजवळ यांचे नाव देऊन स्मृती जोपासणार | आठवले

मुंबई | दलित पँथर पासून आंबेडकरी चळवळीत निस्वार्थ भावनेने गरिबांच्या, झोपडीवासियांच्या हक्कासाठी कार्यरत राहिलेले रिपब्लिकन पक्षाचे लढाऊ ज्येष्ठ नेते दिवंगत बाबुराव शेजवळ यांच्या स्मृती जोपासण्यासाठी चेंबूरमध्ये पी एल लोखंडेमार्ग येथील मैदानास त्यांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

चेंबूर पी एल लोखंडे मार्ग येथील मातोश्री रमाई आंबेडकर अभागृहात दिवंगत बाबुराव शेजवळ यांच्या जाहीर श्रद्धांजली सभेत रामदास आठवले बोलत होते.अध्यक्षस्थानी गौतम सोनवणे होते. विचारमंचावर रिपाइं चे काकासाहेब खंबाळकर, दिपकभाऊ निकाळजे, तसेच दिवंगत बाबुराव शेजवळ यांच्या पत्नी उषा शेजवळ, ऍड. बी के बर्वे, तानाजी जगताप, ऍड.आशाताई लांडगे, जयश्री उपशाम , किसन माने, सिद्धार्थ कासारे, सोना कांबळे, हेमंत रणपिसे, सुभाष किरवले, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्ष हा एक परिवार आहे. रिपब्लिकन चळवळीत काम करणारा कार्यकर्ता दगावला तर त्यांचा परिवार निराधार होऊ नये. त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी निधी तयार करण्याची या सभेत वक्त्यांनी सूचना केली त्यास रामदास आठवलेंनी मान्यता दिली असून दिवंगत बाबुराव शेजवळ यांच्या कुटुंबियांसाठी सांत्वनपर निधी रिपब्लिकन पक्षातर्फे देण्यात येईल. त्या साठी स्वतः रामदास आठवले यांनी पुढाकार घेऊन वैक्तिक 25 हजार देण्याचेयावेळी जाहीर केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अमित ठाकरे यांनी उदयनराजे भोसले यांची घेतली भेट

Aprna

माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे | राम कदम

News Desk

आधार कार्डच्या सुरक्षिततेवरुन ट्राय प्रमुख आणि भाजपा सरकारचा ठाकरेंनी घेतला समाचार

News Desk
मुंबई

गणेशोत्सव मंडळांना दिलासा, मंडपांसाठी मुदतवाढ

News Desk

मुंबई | भाद्रपद म्हणजे हिंदू सणांचा-उत्सवांचा काळ. या उत्सवांना गेल्या काही दिवसांत ‘इव्हेंट’चे स्वरूप प्राप्त झाले. साहजिकच त्याचे राजकीयीकरणही तेवढ्याच गतीने झाले पण, यामध्ये नियमांना मात्र पायदळी तुडविण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत गेले. काही राजकीय पक्षांनीही त्याला नाहक खतपाणी घातले आणि विकासात्मक मुद्द्यांऐवजी नियमांच्या पायमल्लीचेच दादागिरीचे ‘राज’कारण रंगू लागले.

गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी मिळण्याची मंगळवारी अखेरची तारीख होती. मात्र, ऑनलाइन प्रणालीमध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे अनेक मंडळे परवानगीसाठी अर्ज दाखल करू शकली नव्हती. या पार्श्वभूमीवर, आता ही मुदत तीन दिवसांनी वाढवण्यात आली असून, मंडळांना आता अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत मिळाली आहे. मंगळवारपर्यंत सुमारे २,५७९ मंडळांचे अर्ज दाखल झाले असून, यापैकी सुमारे १,४०० अर्ज मंजूर झाले आहेत. त्यामुळे आता तीन दिवसांत हजार परवानग्यांचे महापालिकेसमोर आव्हान आहे.

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण, मुंबई उच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे यावेळी गणेशोत्सव मंडळांची मात्र कोंडी झाली आहे. उत्सवात मंडपांसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन परवानगी देण्यासाठी पालिकाही सज्ज असल्या तरी अधिकृत परवानगीसाठी मात्र गणेशोत्सव मंडळे पुढाकार घेताना दिसत नाहीत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, मंडळाला द्यावे लागणारे प्रतिज्ञापत्र. न्यायालयाने आणि पालिकांनी घालून दिलेल्या अटी पाळल्या न गेल्यास मंडळांच्या पदाधिकाऱ्या वर कारवाई होऊ शकते, तसेच मंडळांची मान्यताही रद्द होऊ शकते. त्यामुळे हतबल झालेली मंडळे अधिकृतरित्या परवानगीसाठी पुढेच येत नसल्याचे चित्र यावर्षी पाहायला मिळत आहे.

परवानग्या रखडल्याने २५ ऑगस्टपासून गणेश मंडळांनी गणेशोत्सव नेहमीच्याच जल्लोषात साजरा होणार, अशी भूमिका घेत मंडप उभारणे सुरू केले होते. शुक्रवारपर्यंत महापालिकेकडे १,४६३ अर्ज आले होते. मुदतीपर्यंतच्या चार दिवसांमध्ये ही संख्या हजाराने वाढली. मंडळांना आता ऑनलाइन मंडप परवानगीसाठी आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देऊन ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन महापालिका सार्वजनिक उत्सव समन्वयक आणि परिमंडळ-२ चे उपायुक्त नरेंद्र बरडे यांनी केले आहे. या वाढीव मुदतीत, तीन दिवसांमध्ये एक हजार अर्ज मंजूर करण्याचे लक्ष्य महापालिकेसमोर आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये परवनागी कामाचा वेग वाढल्याने मंडळांना दिलासा मिळाला आहे.

Related posts

वाशिंद स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेले रोको!

News Desk

अनुदानासाठी महाविद्यालयीन कर्मचा-यांचे बेमुदत उपोषण

News Desk

ओला – उबेर विरोधात टॅक्सी चालकांचा वांद्रे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.

News Desk