HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मतदानाच्या पूर्वसंध्येला जयंत पाटील यांचा नंबर हॅक करून अपप्रचार ! 

सांगली । संगणक प्रणालीचा गैरवापर करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मोबाईल क्रमांक हॅक करून या मोबाईल क्रमांकवरून सांगली लोकसभा मतदार संघात अप प्रचार केल्याचा प्रकार सोमवारी (२२ एप्रिल) उघडकीस आला आहे. जयंत पाटील यांनी सोमवारी रात्री इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कार्यकर्ते व मतदारांनी या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सांगली लोकसभा मतदारसंघात मंगळवार (२३ एप्रिल) रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांचा मोबाईल क्रमांक हॅक करून ‘आपणास गोपीचंद पडळकर यास मदत करायची आहे,’असा खोटा संदेश दिला आहे. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज जनार्दन पाटील यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. पाटील यांनी माजी सभापती दत्ताजी नीलकंठ पाटील रा.आगळगाव यांच्याशी संपर्क केला असता अशा प्रकारचे फोन या मतदारसंघातीलअनेक कार्यकर्त्यांना दिल्याचे निदर्शनास आले आहे.

पाटील यांनी सोमवारी रात्री इस्लामपूर पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली असून इस्लामपूर पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधी गुन्हा दाखल केला आहे. पाटील म्हणाले, फेक कॉलर अपवरून माझा मोबाईल क्रमांक हॅक करून हा खोडसळपणा केला आहे. मी या खोडसाळपणाचा निषेध करतो. कार्यकर्ते व मतदारांनी या खोडसाळपणावर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.

Related posts

पुण्यात स्वॅब टेस्ट लॅब वाढवा, महापौरांनी सरकारकडे पत्राद्वारे केली मागणी

News Desk

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची आपच्या महाराष्ट्राच्या संयोजक पदी निवड

धनंजय दळवी

मनसेतून सेनेत आलेल्या सहा नगरसेवकांना तुर्तास दिलासा

News Desk