HW News Marathi
राजकारण

दूध-अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा

मुंबई | दूध आणि अन्न पदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यावर यापुढे कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानपरिषदेमध्ये केली आहे. अशा प्रकारचे गुन्हेगारांसाठी जन्मठेपेच्या शिक्षेची तरतुद करण्यात यावी असल्याची माहिती बापट यांनी विधानपरिषदेमध्ये दिली. याच अधिवेशनात तसा कायदा करण्यात येणार असल्याचे त्यांनी देखील ते म्हटले आहे.

यापूर्वी अन्नपदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यांसाठी फक्त सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद होती. त्यातही आरोपींना जामीन मिळत होता. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर कायद्याचा धाकही उरला नव्हता. त्यामुळे अशा भेसळखोरांवर आता अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दूध भेसळीबाबत विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मार्च महिन्यात गिरीश बापट यांनी दूध भेसळखोरांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद करण्याचं आश्वासन दिलं होतं.

त्यानंतर दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी अनेक आमदारांनी केली होती. आता विधानपरिषदेत काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गिरीश बापट यांनी ही घोषणा केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राहुल गांधीच्या जॅकेटवरून राजकारण तापले

News Desk

हिजड्याचे लग्न झाले तर त्याला मुले होतील, पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही !

News Desk

राहुल गांधी अमेठीसह केरळमधील वायनाडमधून लढविणार आगामी लोकसभा निवडणूक

News Desk
महाराष्ट्र

धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे निधन

News Desk

चंद्रपूर | तांदळाच्या नऊ जातीचा शोध लावणाऱ्या कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. खोब्रागडे हे गेल्या काही महिन्यांपासून अर्धांगवायू या दुर्धर आजाराशी झुंज देत होते. चंद्रपुरातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. खोब्रागडे यांना आज दुपारी त्यांच्या मूळ गावी नांदेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

खोब्रागडे यांच्याकडे मोजकीच जमीन होती. या जमिनीवर त्यांनी शेतीतील धानावर विविध प्रयोग केले. फक्त तिसरी शिकलेले खोब्रागडे यांनी एचएमटी या प्रसिद्ध अशा तांदळाचा शोध लावला. या तांदळाचा शोध लावून न थांबता. त्यांनी विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी आणि डीआरके टू या नऊ तांदळाचे वाण दादाजी खोब्रागडे यांनी विकसित केले आहे.

  • दादाजी खोब्रागडे यांचा अल्प परिचय

दादाजी रामजी खोब्रागडे यांचे संपूर्ण नाव होते. ते चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड येथील रहिवासी होते. खोब्रागडे यांनी १९८५ ते १९९० या काळात त्यांनी धानाच्या नऊ नवीन वाणांचा शोध लावला. खोब्रागडे यांनी धान संशोधन क्षेत्रातील मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या कार्य बदल फोर्ब्सने २०१० मध्ये जगातील सर्वोत्तम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान दिले होते.

५ जानेवारी, २००५ रोजी अहमदाबाद येथे तत्कालिन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. तर २००६ मध्ये महाराष्ट्र शासनानेदेखील त्यांना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Related posts

केंद्र सरकारने जाचक रस्ते विकास सेस बंद करावा किंवा देशभरातील टोल तरी बंद करावेत !-  नाना पटोले

News Desk

Maharashtra Budget 2022 LIVE Updates : कळसूत्री सरकारने पंचसूत्री बजेट मांडले, फडणवीसांची टीकास्त्र

Aprna

“वर्षभर ३ पक्ष एकत्र विटी दांडू खेळत होते का”, भाजपचा परखड सवाल

News Desk