HW News Marathi
राजकारण

लोकसभेसाठी सेना-भाजपची युती होणार ?

नवी दिल्ली | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सेना-भाजपची युती होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी दिल्लीत आयोजित बैठीकत बोलत होते. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि पवार यांनी महाआघाडी उभारून भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करू इच्छुक आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी उभारण्यासाठी या बैठकीत भाजप विरोधात महाआघाडीसाठी भारिप बहुजन महासंघचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आणि शिवसेना यांनी घेऊन महाआघाडीत सामील करण्यासाठी पवार इच्छुक आहेत. परंतु मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षाला महायुती सामली होण्याबाबात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रश्नचिन्हे उपस्थित केले आहे. तसेच ‘आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती होणार यावर शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केला आहे. परंतु विधानसभेत मात्र युती नसणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.’

तसेच देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत. कारण आता तशी परिस्थती राहिली नाही, असे मत पवारांनी व्यक्त केले आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अगदी राष्ट्रपतींनीही एक देश, एक निणडणूकचा उल्लेक केला होता. त्यामुळे लोकसभा-विधानसभा एकत्र होतील, असा अंदाज गेल्या अनेक महिन्यांपासून वक्त केला जात होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतले विठ्ठल-रखुमाईचे दर्शन

News Desk

संजय राऊतांच्या ED च्या कारवाईबाबत अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Aprna

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण! – मुख्य निवडणूक अधिकारी

Aprna