नवी दिल्ली | कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षात येत्या लोकसभा निवडणुकीत आघाडी झाली असून दोन्ही पक्षात जागा वाटपाबाबतही ठरले आहे. कर्नाटक राज्यातील एकूण २८ जागांपैकी २० जागांवर काँग्रेस तर ८ जागांवर जनता दल सेक्युलर आपले उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. यापूर्वी जेडीएसने लोकसभेसाठी १२ जागांची इच्छा व्यक्त केली होती. परंतु काँग्रेस- जेडीएसने चर्चेनंतर ८ जागांवर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
Karnataka: Congress to contest on 20 seats and JD(S) to contest on 8 seats out of the 28 seats. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/MLWZkkqnw6
— ANI (@ANI) March 13, 2019
कर्नाटकामध्ये काँग्रेस आणि जेडीएस यांची आघाडी हे भाजपसाठी मोठे आव्हान ठरली आहे. २०१४ च्या मागील लोकसभा निवडणुकीत भाजप १७, काँग्रेस ९ आणि जेडीएसला दोन जागांवर विजय मिळाल होता. जेडीएस उत्तरा कन्नडा, चिंकमंगलूरु, शिवमोगा, तुमाकुरु, हासन, मांड्या बंगळुरु नार्थ आणि विजयपुरा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढतील.
चिक्कोडी, बेलागावी, बगालकोट, हावेरी, रायचूर, कलबुर्गी, बिदर, कोप्पाल, बेल्लारी, दावणगेरे, चित्रदुर्गा, धारवाड, दक्षिण कन्नडा, म्हैसुरु, चामराजनगर, बंगळुरु सेंट्रल, बंगळुरु साऊथ, बंगळुरु ग्रामीण, कोलार आणि चिक्कबालपुरा हे २० मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत.
संबंधित बातम्या
#LokSabhaElections2019 : काँग्रेसचे महाराष्ट्रातील ५ उमेदवार जाहीर
#LokSabhaElections2019 : काँग्रेसने ‘या’ अनुभवी उमेदवारांना दिली पुन्हा संधी
#LokSabhaElections2019 : महाराष्ट्रात ४ टप्प्यात मतदान होणार
#LokSabhaElections2019 : जाणून घ्या… राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.