HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

नरेंद्र मोदी हे माझे कोणत्याही प्रकारे शिष्य नाहीत !

मुंबई | “नरेंद्र मोदी हे माझे कोणत्याही प्रकारचे शिष्य नाहीत. ते संघातील आहेत. त्यामुळे त्यांचा आणि माझा काहीही संबंध नाही”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. ते सोलापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते. “मी शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो”, असे पंतप्रधान मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी म्हटले होते. त्याचप्रमाणे यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या पवार कुटुंबियांवर केलेल्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिले आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनतेने स्थापन केलेला आहे. त्यांनी माझ्या कुटुंबाची काळजी करू नये. त्याची आवश्यकता नाही. ज्यांना कुटुंब नाही त्यांनी कुटुंबाच्या ऐक्याबाबत काहीही बोलू नये”, अशी बोचरी टीका शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे. “राष्ट्रवादीत शरद पवारांचे वर्चस्व कमी झाले असून अजित पवार यांचे वर्चस्व वाढले आहे. पवारांनी निवडणूक लढण्याआधीच मैदान सोडले”, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी धुळ्यात झालेल्या युतीच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचारसभेत पवार कुटुंबियांवर टीका केली होती.

“मावळचे शेतकरी आपल्या हक्कांसाठी लढत होते तेव्हा पवार कुटुंबाने त्यांच्यावर गोळीबाराचे आदेश दिले होते. अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्राचा शेतकरी जेव्हा धरणातल्या पाणीटंचाईविषयी विचारणा करायला गेला तेव्हा त्यांना काय उत्तर मिळाले ते मी इथे बोलूही शकत नाही”, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले होते.

Related posts

प्रज्ञासिंग ठाकूर यांनी करकरेंवर केलेली टीका मारलेल्या गटारी पिचकारी | सामना

News Desk

मोदी – फडणवीस हत्येचा कट ही केवळ अफवा

News Desk

ठाकरे-पवारांच्या विमान प्रवासाची चर्चा

News Desk