HW News Marathi
राजकारण

वसंत मोरेंना अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये येण्याची दिली ऑफर; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई | पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी स्वत: पक्षाच्या शहर कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी डावल्याने वसंत मोरेंनी नाराज व्यक्त केली होती. तसेच वसंत मोरेंना मनसे माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची उचलबंडी केली. निलेश माझिरे हे वसंत मोरेंच्या जवळची व्यक्ती असून त्यांची हक्कालपट्टी झाल्यानंतर त्यांनी 400 कार्यकर्त्यांसह पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यानंतर वसंत मोरे नाराज असल्याचा पुन्हा सुरू झाल्या यानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना वसंत मोरेंना राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची थेट ऑफर दिली आहे. अजित पवारांनी वसंत मोरेंना दिलेल्या ऑफरनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

नुकतेच वसंत मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांची भेट घेतली होती. यानंतर एका विवाह सोहळ्यात वसंत मोरे आणि अजित पवार यांनी दोघांनी हजेरी लावली होती. या भेटीदरम्यान अजित पवारांनी वसंत मोरेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. आगामी काळात पुण्यात महापालिका निवडणुका होणार आहे. अजिव पवारांनी वसंतम मोरेंना ऑफर दिल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळा सर्वांच्या भावना उंचावल्या आहेत. यापूर्वी मनसेतून रुपाली ठोंबरे यांनी ही राष्ट्रवादीत प्रवेश केला. येत्या काळात पुणे महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, वसंत मोरेंना मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा न पटल्याने त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर वसंत मोरेंनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान वसंत मोरेंनी त्यांचे मत मांडले. राज ठाकरेंनी पुण्याच्या शहराध्यक्षपदी साईनाथ बाबर यांची नियुक्ती केली होती.

संबंधित बातम्या

भाषण करून न दिल्यामुळे वसंत मोरे पुन्हा नाराज?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूक आयोगाने अमित शहांच्या इशाऱ्यावर प्रचारबंदी लागू केली !

News Desk

“महाविकास आघाडी सरकार OBC आरक्षणाबाबत गंभीर नव्हते,” देवेंद्र फडणवीसांची टीका

Aprna

मंत्रीस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत केवळ अर्धन्यायीक प्रकरणांसाठी आदेश

Aprna