मुंबई । राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अवधूत तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचे पुतणे आहे. काही दिवसांपूर्वी तटकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला तर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मात्र अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे. सुनील तटकरे व अवधूत तटकरे यांच्यात वारंवार खटके उडत आहेत. या भांडणांमध्ये शरद पवार यांनी हस्तक्षेप केला असला तरीही त्यांना यश आलेले नाही. सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे २०१९ची लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे अवधूत तटकरे आत स्वतःची तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.