HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

इतका खोटारडा पंतप्रधान जनतेने पाहिला नाही !

मुंबई । “शरद पवार काय बोलले याचा अभ्यास न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चुकीचा आणि खोटा प्रचार करत आहेत. ते किती खोटारडे आहेत हे आज सिद्ध झाले आहे”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. नाशिक येथील सभेत पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्यावर टीका केली. याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक बोलत होते.

“शरद पवार यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट सांगितले होते की, पाकिस्तानमधील राज्यकर्ते आणि सैन्यदल यांची भूमिका भारतविरोधी आहे. तर जनता तशी नाही. परंतु त्याचा खोटा प्रचार पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस करत आहेत”, असे नवाब मलिक म्हणाले.

“तुमच्याकडे संपुर्ण यंत्रणा आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा बोलले असतील तर आम्हाला दाखवा आम्ही राजकारण सोडून देऊ. मात्र, तसे नसेल तर पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेची माफी मागावी”, अशी मागणी देखील नवाब मलिक यांनी केली आहे.

Related posts

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार ?

News Desk

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींचा खोटेपणा जनतेसमोर आणला !

News Desk

राजस्थानमध्ये १०५ वर्षीय महिलेने बजावला मतदानाचा हक्क

News Desk