HW News Marathi
राजकारण

माझा आणि शरद पवार यांचा थेट कोणताही संबंध आलेला नाही | प्रकाश आंबेडकर

मुंबई |शरद पवार हे खोटं बोलतात. त्यामुळे यापुढे त्यांच्याबाबत मी कुठलाही खुलासा देणार नाही. माझा आणि शरद पवार यांचा थेट कोणताही संबंध आलेला नाही,” या शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे कौतुक करत राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्या टीकेला शरद पवार यांनीही कठोर शब्दात आंबेडकरांवर टीका केली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे.

“आम्ही काँग्रेसशी युती करण्यास इच्छुक आहोत. परंतु राष्ट्रवादीसोबत कधीही युती करणार नाही. शरद पवार हे धर्मनिरपेक्ष असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस धर्मनिरपेक्ष नाही,” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यानंतर ” भाजपला मदत करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षतेचे धडे देऊ नयेत’, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकरांना यांना दिले होते. ” भाजपला मदत करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षतेचे धडे देऊ नयेत’, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकरांना यांना दिले होते.

काय म्हणाले होते शरद पवार

“राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष धर्मनिरपेक्ष नसता तर अकोल्यातील दोन निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नसता. प्रकाश आंबेडकर हे मला आधी धर्मनिरपेक्ष वाटायचे, पण आता वाटत नाहीत,” असेही शरद पवार म्हणाले होते. यावर खुलासा करत प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, “१९९७-९८ साली तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांच्याबरोबर माझे बोलणे झाले होते, त्यात माझ्या पक्षाला चार जागा देण्याचा निर्णय झाला होता. त्यात शरद पवार कुठेही नव्हते”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचल्याचा ‘आप’चा आरोप

Darrell Miranda

शिवसेना-मनसेत पुन्हा पोस्टर वॉर

swarit

#Results2018 : मध्य प्रदेशमध्ये मायावती किंगमेकर ठरणार ?

News Desk
देश / विदेश

सीबीआयचे नाट्य घडवले जात आहे !

swarit

मुंबई। ‘राफेल प्रकरणात मोदी सरकारच्या अडचणी वाढल्यामुळेच सीबीआयचे नाट्य घडवले जात आहे’,असा गंभीर आरोप ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केला आहे. सीबीआयमधील दोन शीर्षस्थ अधिकाऱ्यांना सरकारने आज सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सीबीआयचे दोन अधिकारी आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांचा समावेश आहे. यांपैकी वर्मा यांना चुकीच्या पद्धतीनं पदावरुन हटवल्याचा आरोप प्रशांत भूषण यांनी केला आहे. राकेश अस्थाना या वादग्रस्त अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु आहे. याविरोधात भूषण सर्वोच्च न्यायलायत जाणार असे यांनी सांगितलं.राफेल डीलमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी सीबीआयकडे करण्यात आली होती. ती चौकशी पूर्ण होऊ नये, यासाठी सीबीआयमध्ये हालचाली घडवल्या जात आहेत. असा आरोप भूषण यांनी केला आहे.

काय आहे नेमकं CBI प्रकरण

राकेश अस्थाना यांना सीबीआयचे विशेष संचालक म्हणून पदोन्नती देण्यास आलोक वर्मा यांनी विरोध केला आणि इथेच सीबीआयमध्ये शीतयुद्ध सुरू झाले होते. सीबीआय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करताना अस्थाना यांनी आपल्या शिफारशी धुडकावल्याचं वर्मांना जाणवलं आणि तणाव वाढला. १५ ऑक्टोबरला सीबीआयने अस्थाना यांच्याविरोधात लाच घेतल्याचा गुन्हा नोंदवला. त्यानंतर या प्रकरणाची दखल पंतप्रधान मोदींनी ही घेतलीय. हा वाद शमवण्याचं काम ते आपल्या हुकमी एक्क्याकडे – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे.

Related posts

पुन्हा एक लढाऊ मिग विमान कोसळले

News Desk

आसारामला जन्मठेप | अन्य दोघांना 20-20 वर्षे शिक्षा

News Desk

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले

News Desk