HW News Marathi
राजकारण

आज महाविकास आघाडीचा महामोर्चा; दिग्गज नेत्यांची उपस्थिती

मुंबई | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी महापुरषांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) महामोर्चा काढणार आहे. महाविकास आघाडीचा हा महामोर्चा (Mahamorcha) आज (17 डिसेंबर) सुरू होणार आहे. महाविकास आघाडीचा हा महामोर्चा भायखळ्यातील रिचर्ड सन्स अँड क्रूडास कंपनी ते सीएसएमटी रेल्वे स्टेशनपर्यंत (टाईम्स ऑफ इंडिया) असणार आहे. या पार्श्वभूमीवर अडीच हजार पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

या महामोर्चात समविचारी पक्ष, महाराष्ट्र प्रेमी महापुरुषांना माणणारे सुद्धा सामील होणार आहेत. या महामोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडून नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्य या महामोर्चाला प्रशासनाकडून परवानगी मिळाली नव्हती. यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. परंतु, अखेर महाविकास आघाडीच्या महामोर्चाला परवानगी मिळली. मुंबई पोलिसांनी महामोर्चाला लिखित स्वरुपात परवानगी दिली आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील सहभागी होणार आहेत.

महाविकास आघाडीच्या महामोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ठाकरे गटाचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहे. काँग्रेसकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेता बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आणि इतर नेते उपस्थित असतील. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेते सहभागी होणार आहेत.

महाविकास आघाडीच्या महामोर्चाचा असा आहे मार्ग

महाविकास आघाडीचा महामोर्चा रिचर्डसन क्रुडास मिल, जे. जे. मार्ग उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, टाइम्स ऑफ इंडिया येथील मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी भायखळा येथील नागपाडा जंक्शनमार्गे मुंबई सेंट्रलच्या इथून पुढे जाईल किंवा चिंचपोकळी, सातरस्ता मार्गे आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल या रस्त्याने दक्षिण मुंबईकडे जाता येईल, अशी माहीती वाहतुक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

 

 

Related posts

#ElectionsResultsWithHW : साताऱ्यात उदयनराजेंची ९ हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडी

News Desk

विधान परिषद निवडणुकीत अशी आहे मतसंख्या….

News Desk

#MarathaReservation : मराठा आरक्षण न्यायालयात टिकणारच, मुख्यमंत्र्यांचा दावा

News Desk