HW News Marathi
राजकारण

१० ऑगस्टला भाजपची दुसरी मेगाभरती

मुंबई | भाजपची दुसरी मेगाभरती आता १० ऑगस्टला होणार असल्याची माहिती मिळली आहे. या भरतीत आघाडीसह इतर पक्षातील मोठे नेते रांगेत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भाजपमध्ये काल (३१ जुलै) राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये मेगाभरतीचा पहिला टप्पा पार पडला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आघाडीचे जवळपास ५० आमदार तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात आता इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. कॉंग्रसने मुंबईत उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यात आहे. या मुलाखतीला मुंबईतील काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग भाजपत तर असलम शेख शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहे. त्यातच इतर पक्षांमधूनही शिवसेनेत काही नेते जाणार असल्याची माहिती आहे.

शिवसेना–भाजप युती निवडणूक लढवणार असून निवडणुकीत शिवसेनेच्या वाटेला मुंबईमधील मतदारसंघ मजबूत करण्यावर भर दिला आहे. काँग्रेसच्या मुलाखतीत मालाडचे असलम शेख, धारावीच्या वर्षा गायकवाड, मुंबादेवीचे अमिन पटेल या नेत्यांनी पाठ फिरवली आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांचे कुटुंबही शिवसेनेत जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार मनोहर नाईक आणि त्यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या नव्या तारखेची चर्चा

News Desk

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर

Manasi Devkar

तुम्हाला लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका !

News Desk