HW News Marathi
राजकारण

पॉलिटिशन्स पोल, कोण बनविणार सरकार ?

देशात यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडले आहेत. २३ मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागेल. दरम्यान, एच.डब्ल्यू.न्यूज नेटवर्कने यंदाच्या लोकसभा निवडणुकांचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे. सामान्य मतदारांव्यतिरिक्त थेट राजकीय पक्षांसाठी काम करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून माहिती मिळवत या निवडणुकांच्या संभाव्य निर्णयाचा अभ्यास केला. यात बड्या राजकीय नेत्यांचा नाही तर सतत सामान्य लोकांच्या सहवासात असणाऱ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. म्हणूनच, आम्ही याला “पॉलिटिशन्स पोल” असे संबोधत आहोत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील ग्राऊंड रिऍलिटी जाणून घेण्यासाठी आम्हाला या प्रयोगाची मोठी मदत झाली.

एनडीएमधील महत्त्वाचे पक्ष

  • भारतीय जनता पक्ष
  • शिवसेना
  • जनता दल युनायटेड
  • लोक जनशक्ती पक्ष
  • अकाली दल
  • अपना दल
  • सुहेलदेव भारतीय समाज पक्ष
  • नागा पीपल्स फ्रंट
  • नॅशनल पीपल्स पक्ष
  • युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट
  • सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट
  • महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी
  • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
  • ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन
  • पत्तली मक्कल कच्ची
  • ऑल इंडिया एनआर काँग्रेस

युपीएमधील महत्त्वाचे पक्ष

  • काँग्रेस
  • राष्ट्रीय जनता दल
  • राष्ट्रीय लोक समता पक्ष
  • हिंदुस्थान आवाम मोर्चा
  • लोकतांत्रिक जनता दल
  • नॅशनलिस्ट काँग्रेस पक्ष
  • जनता दल (सेक्युलर)
  • डावे पक्ष
  • डीएमके
  • केरला काँग्रेस

युपीए/एनडीएमध्ये सामील नसलेले पक्ष

  • तृणमूल काँग्रेस
  • आम आदमी पक्ष
  • समाजवादी पक्ष
  • बहुजन समाज पक्ष
  • तेलंगणा राष्ट्रसमिती
  • नॅशनल कॉन्फरन्स
  • पीडीपी
  • तेलगू देसम पक्ष
  • बिजू जनता दल
  • वायएसआर काँग्रेस

आमच्या पॉलिटीशन्स पोल्सनुसार, यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएला २२३ जागा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, एनडीएला जादुई आकडा गाठण्यासाठी ४९ जागा कमी पडत आहेत. हा जादुई आकडा गाठण्यासाठी कोणते पक्ष एनडीएला मदत करू शकतात ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बिजू जनता दल (१४ जागांसह), टीआरएस (१३ जागांसह), वायएसआर काँग्रेस (१५ जागांसह) या पक्षांना आपल्यासोबत घेण्यासाठी एनडीए प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे आणखी एक चर्चा सुरु आहेत ती भाजपकडून होणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांच्या मनधरणीची. अशी चर्चा आहे की भाजपकडून मायावती यांना उप पंतप्रधानपदाची ऑफर देखील देण्यात आली आहे. एनडीएचे हे प्रयत्न यशस्वी ठरले तर एनडीएला आणखी ६२ जागा मिळतील. या पार्श्वभूमीवर अगदी सहजपणे एनडीएला २८५ जागांसह सत्ता स्थापन करता येईल.

आमच्या पॉलिटीशन्स पोल्सनुसार, यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये युपीएला १८७ जागा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी युपीएला ८५ जागा कमी पडत आहेत. या ८५ जागांसाठी यूपीएला सर्वात आधी तृणमूल काँग्रेसच्या (२७ जागांसह) अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना तयार करावे लागेल. त्याचप्रमाणे काँग्रेसला आम आदमी पक्ष (४ जागांसह) बहुजन समाज पक्ष (२० जागांसह) टीआरएस (१३ जागांसह)टीडीपी (५ जागांसह) समाजवादी पक्ष (१५ जागांसह) बिजू जनता दल (१४ जागांसह) वायएसआर काँग्रेस (१५ जागांसह) या पक्षांची मदत घ्यावी लागेल. या पक्षांकडून युपीएला अपेक्षित मदत मिळाल्यास युपीएला आणखी ११४ जागा मिळतील. युपीएला ३०१ जागांसह सत्ता स्थापन करता येईल.

युपीएला सत्ता स्थापनेसाठी हा फायदा मिळू शकतो

युपीएला सत्ता स्थापनेसाठी एक फायदा मिळू शकतो. युपीएकडून अजूनपर्यंत पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव पुढे आलेले नाही. म्हणूनच, याचा फायदा हा युपीएला घेता येऊ शकतो. युपीएने जर पंतप्रधान पद काँग्रेस व्यक्तिरिक्त अन्य पक्षांसाठी सोडले तर यूपीएला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अन्य पक्षांची अपेक्षित मदत मिळणे शक्य होईल. मात्र, भाजपने पंतप्रधान पदाचा उमेदवार आधीच जाहीर केल्याने भाजपला याचा फायदा होऊ शकत नाही.

तिसऱ्या आघाडीसाठी पर्याय

सत्ता स्थापनेचा आणखी एक पर्याय असू शकतो. युपीए आणि एनडीए या दोन्ही पक्षांमध्ये सामील न झालेले सर्व पक्ष जर एकत्र आले तर ते देखील सत्ता स्थापन करू शकतील. मात्र, हे तितकेसे शक्य वाटत नाही. कारण, या तिसऱ्या आघाडीसाठी एकतर भाजप किंवा काँग्रेस या मुख्य पक्षांपैकी कोणत्या तरी एका पक्षाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाठिंबा मिळवावा लागेल. मात्र, यामुळे या तिसऱ्या आघाडीच्या युपीए आणि एनडीएपासून समान अंतर राखण्याच्या मुख्य भूमिकेलाच धक्का पोहोचेल.

तिसऱ्या आघाडीकडे सत्ता स्थापनेसाठी आणखी एक पर्याय आहे. युपीए आणि एनडीएची मोडतोड करून त्यातून काँग्रेस आणि भाजपव्यतिरिक्त असलेल्या प्रत्येक पक्षाला आपल्यासोबत घेऊन तिसऱ्या आघाडीला सत्ता स्थापन करणे, शक्य आहे. मात्र, हे शक्य असले तरीही तितकेच कठीण देखील आहे.

बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अन्य पक्षांची मदत घ्यावीच लागेल

देशातील एकूण राजकीय स्थिती लक्षात घेता इतके नक्की कि यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीए आणि युपीएपैकी कुणालाही एकाला सत्ता स्थापन करता येणार नाही. या दोघानांही बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अन्य पक्षांची मदत घ्यावीच लागेल. त्याचप्रमाणे, हि समीकरणे अगदी शेवटपर्यंत बदलत राहतील. याबाबत कोणालाही गृहीत धरले जाऊ शकत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीन गडकरींनी नौदलाची माफी मागावी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

News Desk

नाणार प्रकल्पासाठी काहीच आठवड्यात जमीन मिळणार, यूएईच्या राजदूतांची माहिती

News Desk

“वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत सोडले मौन

Aprna