नवी दिल्ली | राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील रामगड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला अखेर बहुमत मिळवण्यास यश आले आहे. राजस्थानच्या रामगड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांचा आज (३१ जानेवारी) निकाल जाहीर झाला. काँग्रेसचे शफीया जुबेर यांनी १२ हजार २२८ मतांनी हा विजय मिळवला आहे. या विजयामुळे राजस्थान विधानसभा निवडणुकीत ९९ जागा जिंकलेल्या काँग्रेसच्या १०० जागा पूर्ण झाल्या आहेत.
Rajasthan: Congress party's Shafia Zubair after winning #RamgarhByPoll. She says "People know that we believe in working". She won with a margin of 12228 votes, garnering a total of 83311 votes. pic.twitter.com/lOf6XOVRZ5
— ANI (@ANI) January 31, 2019
”जनतेने विचारपूर्वक केलेल्या मतदानाने मी आनंदी आहे. त्यांनी निर्णय योग्यच आहे. मी जनतेचे आभार मानतो. या विजयामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा आत्मविश्वास आणखी वाढेल”, असे म्हणत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. ही पोटनिवडणूक म्हणजे अशोक गहलोत यांच्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनली होती.
राजस्थान विधानसभा निवडणुकासाठीची मतदान प्रक्रिया ७ डिसेंबर रोजी पार पडली. ११ डिसेंबर रोजी पाचही राज्यांचे निकाल जाहीर झाले. मात्र बसपाचे उमेदवार लक्ष्मण सिंग यांच्या निधनामुळे राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रामगड विधानसभा मतदारसंघासाठीच्या मतदानाला स्थगिती देण्यात आली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.