HW News Marathi
राजकारण

लोकसभेसाठी सपा-बसपाचे जागावाटप जाहीर

लखनौ | उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव करण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती महाआघाडी केली आहे. सपा आणि बसपाने आज (२१ फेब्रुवारी) लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप जाहीर झाले आहे. बसपा ३८ आणि सपा ३७ जागांवर लोकसभेच्या निवडणुका लढविणार आहे. तसेच उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात एकूण ८० जागांपैकी ७५ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सपा-बसपा महाआघाडीने अमेठी आणि रायबरेलीच्या जागा काँग्रेसला सोडली असली तरी या आघाडीत मात्र काँग्रेसला स्थान दिले नाही. तर मथुरा, बागपत आणि मुझफ्फरनगरच्या जागा राष्ट्रीय लोकदल पक्षाला देण्यात आल्या आहेत. जागावाटपानुसार उत्तर प्रदेशमधील पश्चिम भागाकडीन सर्वाधिक जागा सपा आणि पूर्व भागातील सर्वाधिक जागा बसपाकडे आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : गोवा काँग्रेसकडून राज्यात सत्ता स्थापनेचा दावा

News Desk

“कसबा विजयानंतर काँग्रेस राज्य आणि देश जिंकू; परंतु…”, मुख्यमंत्र्यांची सभागृहातून टीका

Aprna

ठाकरे चित्रपट ‘बेस्ट’, गाणी ‘बेस्ट’ म्हणत संजय राऊत यांची मुख्य प्रश्नाला बगल

News Desk