HW News Marathi
राजकारण

मार्चच्या पहिल्याच आठवड्यात लोकसभा निवडणुकाची घोषणा ?

नवी दिल्ली | पाच राज्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या राज्यांच्या निकालानंतर आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लोकसभेची निवडणूक ६ ते ७ टप्प्यात होणार आहे. लवकरच निवडणूक आयोग यासंदर्भातील घोषणा करणार आहे.

एकीकडे सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे विरोधकही मागे नाहीत. काँग्रेसने मित्रपक्षांची मोर्चे बांधणी करून भाजपविरोधात महाआघाडीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यादव एकत्र आले आहेत.

तसेच निवडणूक जाहीर होण्यासाठी जेमतेम सव्वा महिना राहिला असताना कर्नाटकातील राजकारणालाही जोर आला आहे. मध्यप्रदेशमध्येही भाजपचा सरकार उलथवण्याचा प्रयत्न सुरूच आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय रंगत वाढणार असल्याची चित्र दिसणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचे लवकरच जागा वाटप होणार असून शिवसेना-भाजप दोघांचे ही स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रयत्न करा – रविंद्र चव्हाण

Manasi Devkar

वन खात्याचे नाव बदलून शिकारी खाते असे करायला हवे!

News Desk

रजनी पाटील यांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीवरून विरोधकांचा राज्यसभेत गोंधळ

Aprna