HW News Marathi
राजकारण

स्वाभिमानी-आघाडीच्या नेत्यांची आज महत्वपूर्ण बैठक

मुंबई | वंचित बहुजन आघाडीच्या दबावामुळे बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आणखी एक जोरदार दणका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिर्डी, औरंगाबाद, नंदुरबार धुळे आणि सांगली मतदार संघातल्या काही तगड्या आणि इच्छुक उमेदवारांनी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर अशी माहिती यांनी दिली आहे. तसेच तुपकर यासंदर्भात पक्षाध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची भेट देखील झाली आहे. तर इतर मतदारसंघातील काही नेते तुपकर यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे.

धनगर प्रश्नावरून रान उठवणारी नेते मंडळीनी खासदार राजू शेट्टी यांची भेटीचे वृत्त समोर आले आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमकपणे स्वबळाचा इशारा दिल्यानंतर आघाडीला नमते घेण्यावे लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे आघाडीकडून स्वाभिमानीची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आज स्वाभिमानीच्या नेत्यांची आणि आघाडीच्या काही प्रमुख नेत्यांची भेट होण्याची शक्यता आहे.

ही बैठक आज ३ वाजताच्या सुमारस होणार असून या बैठकीत राष्ट्रवादी नेते आणि विधानपरिषदेचे विरोधपक्ष नेता धनंजय मुंडे यांच्यात चर्चा होणार आहे. संपूर्ण कर्जमाफी आणि दीडपट हमीभाव ही दोन विधेयके चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. बुलढाणा आणि वर्धा या लोकसभेच्या जागेचा हट्ट कायम असल्याचे स्वाभिमानीचे म्हणणे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसने शेतकऱ्यांना बरबाद केले, पंतप्रधान मोदींची जहरी टीका

News Desk

स्मार्ट सिटीच्या नावाखाली मनसेने केलेलीच कामे भाजपने आम्ही केली असे दाखवले !

News Desk

माझे नरेंद्र मोदींवर प्रेम मात्र त्यांच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार !

News Desk