HW News Marathi
राजकारण

देशभरात लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात

नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकीचे सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज (१९ मे) मतदानाला सुरुवात झाली आहे. देशभरात शेवटच्या टप्प्यात ५९ मतदार संघांत मतदान होत आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी १३मतदार संघांत मतदान होत आहेत. यात प. बंगालमध्ये नऊ, बिहार व मध्य प्रदेशात प्रत्येकी आठ, हिमाचल प्रदेशात चार तर झारखंडमध्ये तीन मतदार संघांत मतदान होत आहे. याशिवाय केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंदिगडमध्येही मतदान पार पडत आहे. सुमारे दहा कोटी मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
आज वाराणसीमध्येही मतदान होणार आहे, याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या सामना काँग्रेसच्या अजय राय, एसपी-बीएसपी-आरएलडी महाआघाडीच्या शालिनी यादव यांच्याशी होणार आहे. याठिकाणी एकूण २५ उमेदवार आपलं नशिब आजमावत आहेत.
बिहारच्या पटना साहिब मतदारसंघातून अभिनेते शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसच्या तिकीटीवर मैदानात असून त्यांच्यासमोर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचं आव्हान असणार आहे. पंजाबच्या गुरूदासपूरमधून अभिनेता सनी देओलला भाजपने उमेदवारी दिली आहे. सनी देओलच्या विरोधात काँग्रेसकडून विद्यमान खासदार सुनील जाखड मैदानात आहेत. चंदीगडमधून भाजपच्या विद्यमान खासदार किरण खेर आणि काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री पवन कुमार बन्सल यांच्यामध्ये सामना होणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाला फसविणाऱ्या लोकांना मोदी सरकार मदत करते!

swarit

शक्ती मिशन’चे संपूर्ण देशाला कौतुक, पंतप्रधानांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

News Desk

भाजप पूर्णपणे मोदी-शहांच्या कब्जात आहे | निरुपम

News Desk