HW News Marathi
राजकारण

2024 लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनुराग ठाकूर डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर दौऱ्यावर

मुंबई | भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपचा लक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीवर (Baramati) आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे हे या बारामतीच्या खासदार आहे. बारामती पाठोपाठ भाजपने आता शिंदे गटाच्या मतदारसंघात देखील लक्ष केंद्रीत केलेले दिसून येत आहे. भाजपने कल्याण लोकसभा मतदारसंघाची  महत्त्वाची जबाबदारी प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांच्याकडे देण्यात आली. या पार्श्वभूमीवर ठाकूर आज (11 सप्टेंबर) डोंबिवलीमध्ये तर ११ ते १३ सप्टेंबरमध्ये कल्याण उल्हासनगर आणि अंबरनाथ येणार आहेत. या बैठकीत भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संघातील प्रमुख जेष्ठ कार्यकर्ते यांच्यासोबत बैठका करणार आहेत.

दरम्यान, आज 2000 कार्यकर्ते उपस्थित राहतील असे नियोजन भाजप कडून करण्यात आले आहे.तसेच डोंबिवली आणि ग्रामीण परिसरात भाजप तर्फे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे.  यापूर्वी भाजपच्या नेते आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन येत्या काही दिवसात बारामतीचा दौरा करणार आहेत. भाजपने २०१९ मध्ये A फॉर अमेठी जसे प्लॅन राबविला होता तसेच प्लॅन यंदा भाजप कढून B फॉर बारामतीचा नियोजन करण्यात येत असल्याचा भाजपच्या अनेक नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रसार माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रीया दिली होती. फडणवीस म्हणाले होते, “भाजपचा असे कुटला प्लॅन नाही जसे भाजपचा मिशन भारत होता तसेच बारामती महाराष्ट्रमध्ये येते म्हणून हा मिशन बारामती नसून मिशन महाराष्ट्र आहे”, असे फडणवीस म्हणाले होते.

 

 

Related posts

“सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर…”, नितेश राणेंचा पत्रातून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला

News Desk

…म्हणून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आवश्यकता भासू शकते !

News Desk

काँग्रेसच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी घेतले महत्त्वाचे निर्णय

News Desk