HW News Marathi
राजकारण

तुमच्या काळजीवाहू सरकारचीच आम्हाला काळजी !

मुंबई | विधानसभेचे निकाल लागल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला पेच अद्याप सुटू शकलेला नाही. महायुतीचे दोन्ही महत्त्वाचे पक्ष असणाऱ्या भाजप-शिवसेना मुख्यमंत्रीपद आणि सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावरून मागे हटण्याचे नाव घेत नाहीये. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील घडामोडींना देखील चांगलाच वेग आला आहे. उद्या (९ नोव्हेंबर) महाराष्ट्रातील फडणवीस सरकारचा कार्यकाळ संपणार असून त्याच्या एक दिवसपूर्वीच आज (८ नोव्हेंबर) नुकताच देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला आहे. दरम्यान यावेळी फडणवीसांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या पत्रपरिषदेनंतर लगेच संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीआहे. तर याच पार्श्वभूमीवर स्वतः उद्धव ठाकरे संध्या.६ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत

काय म्हणाले संजय राऊत ?

  • मी आणि शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा शब्दन् शब्द ऐकला
  • नवे सरकार स्थापन होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांना काळजीवाहू म्हणून काम पाहावे लागेल. आम्हाला त्याचीच काळजी आहे.
  • देवेंद्र फडणवीसांच्या सर्व विधानांवर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच बोलतील.
  • काळजीवाहू सरकारचीच आम्हाला काळजी
  • फॉर्म्युल्यावर देखील उद्धव ठाकरेच बोलतील
  • उद्धव ठाकरेंची ६ वाजता पत्रकार परिषद
  • पंतप्रधानांवर आणि गृहमंत्र्यांवर आम्ही अशी कोणतीही टीका केलेली नाही. मुख्यमंत्र्यांचे ते वक्तव्य चुकीचे
  • आम्ही कायम पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री आम्ही शाह यांचा आदरच केला आहे.
  • जर आम्हाला वाटलं तर आम्ही सरकार स्थापन करू शकतो. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होऊ शकतो
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र सामाजिक न्याय विभाग महामंडळांच्या कर्ज वितरणासाठी ३१५ कोटींची शासनहमी

News Desk

#LokSabhaElections2019 : शरद पवार हे जाणते नेते, ते ज्योतिषी कधीपासून झाले ?

News Desk

पडत्या काळात संजय राऊत नेहमीच पाठीशी उभे राहतात !

News Desk