HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्रात युतीसाठी झुकणार नाही !

नवी दिल्ली | महाराष्ट्राती भाजप सेना युतीसंदर्भात भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात युती करायची असल्यास आम्ही झुकणार नाही. युतीसाठी आम्ही काहीही गमावण्याच्या, कशावरही पाणी सोडण्याच्या मनस्थितीत नाही, असेही शहा म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शहांनी भाजपा खासदारांची बैठक घेतली. त्यावेळी अत्यंत मोजक्या शब्दात अमित शहा यांनी युतीसंदर्भात आपली भूमिका मांडली आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील खासदारांची बैठक बुधवारी दिल्लीत पार पडली. महाराष्ट्रात युती करायची असेल, तर काही गमावून का करायची? काही गमावून अजिबात युती अजिबात केली जाणार नाही, असे शहा यावेळी बोलताना म्हणाले. बिहारमध्ये भाजपाने मित्रपक्षांसाठी स्वत:च्या कोट्यातील काही जागा सोडल्या. त्यामुळे संयुक्त जनता दल आणि लोक जनशक्ती पार्टीला मोठा फायदा झाला. या पार्श्वभूमीवर शिवसेनादेखील भाजपावर दबाव वाढवून अधिकच्या जागा पदरात पाडून घेईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र ही शक्यता अमि शहा यांनी त्यांच्या बोलण्यातून पूर्णपणे फेटाळून लावली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Shivsena Dasara Melava 2018 | मी टू मी टू नका करु, कानाखाली जाळ काढा !

News Desk

शरद पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

सिद्धार्थ कॉलनीतील वीजपुरवठा पूर्ववत सुरू, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

News Desk