HW Marathi
राजकारण

मी माझ्या घरातील मुलांचे बालहट्ट पुरवणार, दुसऱ्यांचे कशाला!

सुजय विखे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो, अमुक एका जागेचा हट्ट करतो. त्यांचा बालहट्ट पुरवण्याची जबाबदारी इतर पक्षांची नाही, आपल्या मुलाचा हट्ट ज्यानं त्यानं पुरवावा. माझ्या घरातल्या मुलांचा हट्ट मी पुरवेन, दुसऱ्याच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू त्यांना काय वाटेल? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवारांची उमेदवारी आणि सुजय विखेंच्या भाजपप्रवेशावर भाष्य केलं आहे.

सुजय यांचा खासदारकीचा बाल हट्ट यावर सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. त्यावर डॉ. सुजय विखे पाटील यांचा हट्ट पुरविण्याची जबाबदारी त्यांच्या वडिलांची आहे. दुसऱ्याच्या मुलाचा बालहट्ट माझ्या पक्षाने का पुरवावा, असंही शरद पवार यांनी मुंबईत एका कार्यक्रमाला आल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

 

Related posts

पेट्रोल डिझेल दरवाढ प्रश्नावर जनतेच्या भावना दुखाविण्याचा हेतू नव्हता | आठवले

News Desk

भारतीय सैन्याचे रक्त लागलेली पाकिस्तानची साखर कशी खायची

Kiran Yadav

जेव्हा उदयनराजे डंपर चालवतात…

News Desk