HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

भाजपचं ‘मिशन बारामती’ यशस्वी होणार? का भडकल्या निर्मला सीतारामन

पुणे | आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने बारामती लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना शह देण्यासाठी भाजपने ‘मिशन बारामती’चं रणशिंग फुंकलंय. त्यासाठी भाजपने शरद पवार यांच्या बालेकिल्ल्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार निर्मला सीतारामन तीन दिवसीय बारामती दौऱ्यावर आल्या आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्याचा पहिलाच दिवस मोठ्या चर्चेत आला आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने आतापासूनच तयारी करायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणजे भाजपने आता पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीकडे विशेष लक्ष दिलं आहे. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा काहीही करुन भाजपचा महापौर मुंबई महापालिकेत बसवायचाच असं आवाहन अमित शाहांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यानंतर आता निर्मला सीतारामन यांचा बारामती दौरा महत्त्वाचा मानला जात असताना पहिल्याच दिवशी सीतारामन कार्यकर्त्यावर संतापल्या, ज्यामुळे कार्यकर्ते देखील काहीसे नाराज झाल्याचं पाहायला मिळालं.

नेमकं काय घडलं?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तीन दिवसीय बारामती दौऱ्यावर आल्या असून कालपासून (गुरुवार, 22 सप्टेंबर) त्यांनी ‘मिशन बारामती’ मोहिमेला सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी सीतारामन यांनी पुण्यातील सासवड येथे भेट दिली. यावेळी त्यांनी भाजपच्या बूथ अध्यक्षांची बैठक घेतली. मात्र ही बैठक झाल्यावर परत जात असताना एका कार्यकर्त्याने त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा आग्रह केला. परंतु निर्मला सीतारामन यांना ते फार काही आवडलं नसल्याचं चित्र पाहायला मिळालं. इतकंच नाही तर त्यांनी त्या कार्यकर्त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रसंग व्हिडिओमध्ये कैद झाला असून सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

पहा व्हिडिओ :

बारामती दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी निर्मला सीतारामन कार्यकर्त्यावर भडकल्या

निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत सासवडमध्ये भाजपच्या बूथ कमिटीच्या अध्यक्षांची बैठक पार पडली. केंद्राच्या योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवा, अशा सूचना सीतारामन यांनी या बैठकीत दिल्या. तर ही बैठक संपल्यानंतर त्या निघाल्या असताना एका कार्यकर्त्यावर भडकल्या. या कार्यकर्त्याला आणि त्यांच्या कुटुंबाला सीतारामन यांच्या एक फोटो काढायचा होता. तर आम्ही संपूर्ण कुटुंब सकाळपासून तुम्हाला भेटण्यासाठी थांबलो आहोत, असं या कार्यकर्त्याने अर्थमंत्र्यांना सांगितलं. पण यावरून सीतारामन यांनी थेट कार्यकर्त्याला झापलं. यानंतर त्या तिथून निघून गेल्या. दरम्यान ज्या कार्यकर्त्यावर त्या भडकल्या त्या कार्यकर्त्याने नंतर आपल्या भावना व्यक्त करताना म्हंटलं की त्यांच्या वडिलांपासूनच आम्ही भाजपचे काम करत आहोत. त्यामुळे एक आठवण म्हणून आम्हाला फोटो हवा होता. दरम्यान पहिल्याच दिवशी निर्मला सीतारामन यांनी कार्यकर्त्याला झापल्याने भाजपच्या मिशन बारामतीला याचा फटका बसणार का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना-भाजप युतीवरून चंद्रकांत खैरेंचा अब्दुल सत्तार यांना घरचा आहेर

Aprna

शरद पवारांनी बोलावली बैठक

News Desk

दाऊदसाठी आता भीक मागितली जाते मात्र शरद पवारांनी ती संधी गमावली !

News Desk