HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री सर्व प्रकल्प गुजरातला घेऊन जाणार का ?

मुंबई | मुख्यमंत्री महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातला घेऊन जाणार का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपस्थित केलाय. नाणार प्रकल्प महाराष्टातून जावू नये असे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी मत व्यक्त केले होते.

मग राष्ट्रवादीचा या प्रकल्पाचा विरोध आहे का असे विचारले असता तटकरे यांनी सावध भूमिका घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे म्हणाले, स्थानिकांची कोकणच्या नैसर्गिक सौंदर्याला धक्का पोहचू नये अशी इच्छा असल्यामुळे स्थानिकांचाच विरोध असल्याचे सांगत तटकरेंनी प्रश्नाला बगल दिली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला विरोध होत राहिला तर हा प्रकल्प गुजरातला जाईल असे मुख्यमंत्री म्हटले.

यावर बोलताना तटकरे म्हणाले, प्रत्येक प्रकल्प हे जर दुस-या राज्यात मुख्यमंत्री घेऊन जाणार असतील तर महाराष्ट्रात कोणते प्रकल्प शिल्लकच राहणार नाहीत . प्रत्येकजण आपल्या स्टाईलने नाणार प्रकल्पाला विरोध करत आहे. ताडदेव येथील नाणार प्रकल्पाचे ऑफिस फोडले ही मनसे स्टाईल आहे.

तसेच स्थानिकांचा विरोध डावलून शिवसेना कदापि नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, अशी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तर दुस-या बाजूला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही झाले तरीही हा प्रकल्प होऊ देणार नाही म्हणजे नाही असे म्हटले. राज्य सरकारला काय करायचे ते करु देत अशा शब्दात सरकारवर तटकरेंनी निशाणा साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न | आव्हाड

News Desk

पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

News Desk

रायगडमधून तटकरे तर कोल्हापुरातून महाडिक लोकसभेच्या रिंगणात

News Desk