नवी दिल्ली । भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने महेंद्र सिंग धोनीची पाठराखण केली आहे. T-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघातून माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला वगळण्यात आले, त्याची पाठराखण करताना सचिन म्हणाला की, ” धोनीला वगळण्यामागे निवड समितीची काय नेमकी मानसीकता आहे, हे मला माहिती नाही. त्याचबरोबर ड्रेसिंग रुममध्येही काय वातावरण आहे, हे मला माहिती नाही. पण धोनी हा क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारामध्ये चपखल बसणारा खेळाडू आहे. सध्याच्या घडीला धोनीवर जी परिस्थिती आली आहे, ती माझ्यावरही आली होती. त्यावेळी मला जे काही करायचे होते ते केले. या परिस्थितीत धोनीला काय करायला हवे, हेदेखील त्याला चांगलेच माहिती असेल.”
I don’t know what’s the mindset of the selectors is & I haven’t looked to influence anyone by giving opinions as what happens in dressing room & between captain, coach & selectors should stay within them: Sachin Tendulkar on MS Dhoni dropped from T20 squad pic.twitter.com/BymXG1rHw8
— ANI (@ANI) November 1, 2018
वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात धोनीला वगळले होते . त्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होतात्यामुळे धोनीचे चाहते चांगलेच वैतागले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.