HW News Marathi
Uncategorized

वाडिया रुग्णालयाला ४६ कोटी देणार, अजित पवारांचे आश्वासन

मुंबई | मुंबईतील लहान मुलांचे स्पेशलिस्ट असलेले सुप्रसिद्ध वाडिया रुग्णालयाला येत्या दोन दिवसात ४६ कोटी देणार असल्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांना दिली आहे. अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री असल्याने भेटलो असल्याची त्यांनी सांगितले. वाडिया रुग्णालयाच्या घोळावर तोडगा निघणार असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी बैठकीनंतर माध्यमांना दिली.

वाडिया रुग्णालय बंद होऊ नये, अशी भूमिका घेत काल (१३ जानेवारी) लाल बावटा कामगार संघटनेकडून तीन दिवसीय धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शर्मिला ठाकरे यांनी देखील सहभाग नोंदविला आहे. यानंतर आज (१४ जानेवारी) मंत्रालयात शर्मिला ठाकरे आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीसाठी गेले होते. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठक पार पडली. तसेच महापालिकेकडून वाडिया रुग्णालयाला आज २२ कोटी रुपयांचे अनुदान तातडीने देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, अजित पवार आणि शर्मिला ठाकरे यांच्यात वाडियावर बैठक संपली आहे. तर मंत्रालयाच्या दुसऱ्या बाजुला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दालनात वाडिया रुग्णालयात मुंबईपालिकेचे महापौर यांच्यासोबत बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागेल आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राधाकृष्ण विखे-पाटील आणि अब्दुल सत्तार एकाच मंचावर, भाषणात जुन्या आठवणींना उजाळा!

News Desk

मला माफ करा… मी हरलो…!

News Desk

आरोग्याचा विषय सोडला तर काहीच महत्त्वाचा अजेंडा नसताना अट्टाहास का?

swarit