HW News Marathi
Uncategorized

२०२२ मध्ये शरद पवारांना राष्ट्रपती बनविणार | संजय राऊत

मुंबई | २०२२ मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती बनविण्याचे ध्येय आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहे. राऊत पुढे म्हणाले की, “२०२२ मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असेल,” असा विश्वास राऊतांनी मुलाखती व्यक्त केला आहे.

या मुलाखतीदरम्यान राऊत म्हणाले की, “आम्ही सर्वप्रमथ याबाबत शरद पवार यांच्याशी बोलून त्यांची परवानगी घेणार लागणार आहे. यात काही अडचण असेल असं मला वाटत नाही. शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. तसेच ज्येष्ठ राजकारणी म्हणून सन्मान केला जातो. त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि राजकीय बुद्धीमत्ता पाहता ते भारताच्या घटनात्मक प्रमुख म्हणून पात्र आहेत. महाराष्ट्र त्यांचा ऋणी आहे,” असे राऊतांनी सांगितले.

शरद पवार राष्ट्रपती व्हावे, यासाठी राऊत हे लवकरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी मुलाखतीत सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहेच शिवाय हतबलही झालेय – नवाब मलिक

News Desk

आजी-माजी मुख्यमंत्री कोल्हापूरातील शाहुपुरीत आमने-सामने

News Desk

खेड पंचायत समिती सभापतीपद राष्ट्रवादीकडे, बहुमत असूनही शिवसेनेला धक्का!

News Desk