HW News Marathi
Uncategorized

महाविकासआघाडीचे ‘मिशन’ नवी मुंबई, गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

नवी मुंबई | राज्यात महाविकासआघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे. यानंतर आता महाविकासआघाडीने नवी मुंबई महानगरपालिकेकडे मोर्चा वळविला आहे. येत्या ९ मे २०२० रोजी नवी मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज (४ फेब्रुवारी) महाविकासआघाडीची वाशीत पहिला मेळावा आयोजित केला आहे. महाविकासआघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. या मेळाव्यात प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत गेलेले गणेश नाईक यांनी ४८ नगरसेवकांसह भाजपत प्रवेश केला होता. त्यामुळे महापालिकेवर भाजपची सत्ता आली. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकासआघाडी अस्तित्वात आली. नवी मुंबई महापालिका ही बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गणेश नाईक यांच्या बालेकिल्ल्या महाविकासआघाडीची सुरूंग लावण्याचा मानस केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (३ फेब्रवारी) झालेल्या बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. वाशी महाविकासआघाडीच्या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असेल. तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार राजन विचारे हेही या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत परस्परांविरोधात लढणाऱ्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत मनोमिलन व्हावे, यासाठी तसेच कार्यकर्त्यांत संवादासाठी या मेळाव्यातून प्रयत्न केले जातील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सेक्स शारिरीक नव्हे मानसिक समस्या…

News Desk

धारावीतील ‘त्या’ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू

Gauri Tilekar

“Parambir Singh जातील कुठे? देशातच असतील, राज्य सरकारची जबाबदारी”- Raosaheb Danve

News Desk