HW News Marathi
महाराष्ट्र

“अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणारच” किरीट सोमय्यांचा दावा!

सिंधुदुर्ग। गेल्या काही दिवसांपूर्वीच परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस मिळाली आहे. आणि आता परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोलीतील दोन रिसॉर्ट अनिधिकृत आहेत. त्यापैकी एकावर कारवाई करण्याचे आणि परब यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, परब मंत्री असल्याने त्यावर कारवाई होत नाही, असा आरोप करतानाच परब यांची आज ना उद्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी तर होणारच आहे. पण त्यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी गुन्हेही दाखल होणार आहेत. त्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला. संचयनी ग्रुपकडून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आणि आमदार नितेश राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध घोटाळ्यांवर भाष्य केलं.

केंद्राच्या टीमने राज्य सरकारने सांगितलं होतं

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिंडळातील मंत्री अनिल परब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत. त्याची चौकशी झाली आहे. त्यावर कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे. त्यातील एका रिसोर्टचं नाव साई रिसोर्ट अॅनेक्स असं आहे. तर दुसऱ्याचं नाव सी-कॉन्च रिसोर्ट असं असून हा रिसॉर्ट आपल्या मालकीचा असल्याचं लपवण्याचा परब यांचा प्रयत्न आहे. हे दोन्ही रिसोर्ट अनधिकृत असल्याचं केंद्राच्या टीमने राज्य सरकारने सांगितलं होतं. दोन्ही रिसोर्टमध्ये सीआरझेडचा भंग झाला आहे. पण सरकारने केवळ साई रिसोर्ट तोडण्याचा आदेश दिला आहे. दुसरा रिसोर्ट वाचवण्याचं पाप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलं आहे. पण आम्ही या रिसोर्टवर कारवाई करायला लावूच, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

लोकायुक्तांना राज्यपालांनी आदेश दिले

परब यांनी 11 ते 12 कोटींची बेनामी संपत्ती जमवली आहे. सचिन वाझेकडून आलेले हप्ते याकडे वळविले आहे. याची चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. जून 2021मध्ये लोकायुक्तांना राज्यपालांनी आदेश दिले. तसेच अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या साई रिसोर्टची लोकायुक्तात सुनावणी सुरू झाली आहे. पहिल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने पाच पानी अहवाल दिला. त्यात त्यांनी रिसोर्ट अनधिकृत असल्याचं म्हटलं आहे. मालकांना नोटीस दिल्या आहेत. रिसोर्ट आणि मालकांवर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. पण ते मंत्री असल्याने कारवाई होत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आढळराव-पाटील ठाकरे सरकारवर भडकले ! ‘या’गोष्टीचा केला तीव्र शब्दांत निषेध

News Desk

…यावरुन आदित्य ठाकरेंचा पुणेकरांना चिमटा

swarit

जयंत पाटील अलर्ट… संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेत प्रशासनाशी घेतली बैठक!

News Desk