HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल माफ करणार नाही’, निलेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज(१९ जुलै) स्वतः गाडी चालवत सहकुटुंब महापूजेसाठी पंढरपुरात रवाना झाले आहेत. देशात संचारबंदी लागू असून पण मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासह महापूजेसाठी निघाले आहेत. यावरून आता राजिक्य वातावरणात खळबळ माजली आहे. अनेक विरोधी नेते आपलं मत देत आहेत आणि आता भाजप नेते निलेश राणे यांनीही मुख्यमंत्रयंवर हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही

आपल्या ट्विटर वरून निलेश राणे यांनी आपलं मत बेधडक पणे व्यक्त केलं आहे. ‘जो माणूस महाराष्ट्र हातात येऊन चालू शकला नाही, तो माणूस गाडी चालवत मुंबईबाहेर गेला तर त्यात काय मोठा पराक्रम??? विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी या मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही. कारण, इतक्या सहजपणे महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला माफी नाही’, अशा शब्दात निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.

केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यांवर जबरदस्त टीका

भाजप नेते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर वरून उद्धव ठाकरे यांच्यावर नेम साधून हल्ला केला आहे. ‘जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम. पावसाने मुंबईचा चक्का जाम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. एमपीएससी विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम, तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला. वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री…’ अशा ओळीद्वारे उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्री स्वतः गाडी चालणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मुंबईतील मातोश्री निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले.उद्या (२० जुलै २०२१) आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्निक रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा ताफा आज (१९ जुलै) दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरच्या दिशेने रवाना झाला.

मुंबईमध्ये सतत कोसळणारा पाऊस आणि खराब हवामानामुळे त्यांना विमानाने पंढरपूरला जाता येणं शक्य नसल्याने ते रस्ते मार्गानेच पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेत. विशेष म्हणजे मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरला चाललेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून या महापुजेला उपस्थित राहण्याचं हे दुसरं वर्ष ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी हातात मिस्टर इंडियाचे घड्याळ घातले!

Aprna

नांदेडमधील होल्ला मोहल्ला कार्यक्रमात तुफान राडा, पोलिसांच्या गाड्या फोडल्या!

News Desk

धनंजय मुंडेंनाही पावसाचा फटका, ईस्टर्न फ्री वेवर पावसामुळे अडकले

News Desk