HW News Marathi
व्हिडीओ

मोर्चेबांधणी मुंबई मनपा निवडणुकीची ! काय असतील नवी विजयाची समीकरणे ?

मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका आहे. साहजिकच या महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या खिशात ठेवण्यासाठी राजकीय पक्षांची धडपड सुरु असते. त्यामुळेच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्ष आता तयारीला लागले आहेत. निवडणुकांना बराच वेळ असला तरी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात झालेली आहे. खरंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर सगळीच राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून गेलीत. मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या राजकीय गणिताबाबत सुरु असलेल्या चर्चांचा विचार करायचा, किंवा एकंदर काय काय भूमिका समोर आल्यात ते पाहायचं झालं तर एकीकडे महाविकासआघाडी म्हणजेच शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस ते तिन्ही पक्ष आता जवळपास सर्व निवडणूक एकत्र लढविण्याच्या मनस्थितीत असल्याचे काही बड्या नेत्यांच्या विधानांमधून लक्षात येत होते. मात्र असे असतानाच काँग्रेसने मुंबईमध्ये स्वबळाची नारा दिला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजप मनसे एकत्र येणार असल्याच्याही चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, भिन्न विचारधारेमुळे ह्यात अनेक ‘जर तर’चे मुद्दे उपस्थित होतात.

#UddhavThackeray #BMCElections #DevendraFadnavis #SharadPawar #RajThackeray #BhaiJagtap #BJP #Shivsena #MVA #MahaVikasAghadi #MNS #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर इच्छामरण टळले का?…

News Desk

पेट्रोलच्या दरात चार वर्षातील विक्रमी वाढ, मुंबईकरांनी केला संताप व्यक्त

swarit

#SushantSingh आणि #DishaSalian मृत्यू प्रकरण आहे तरी काय? ठाकरे अडचणीत येणार?

News Desk