HW News Marathi
महाराष्ट्र

आमदारकीसाठी अनेक इच्छूक, आम्ही सर्वांचीच इच्छा पूर्ण करू शकत नाही !

मुंबई | विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकासआघाडी सरकारकडून शनिवारी (६ नोव्हेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे १२ नावांची यादी सुपूर्द करण्यात आली आहे. दरम्यान यावर आता राज्यपाल काय निर्णय घेणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी “आमदारकीसाठी अनेकजण इच्छूक होते. मात्र, सर्वांचीच इच्छा आम्ही पूर्ण करू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.

जयंत पाटील यावेळी बोलताना म्हणाले, “आमदारकीसाठी अनेकजण इच्छूक होते. मात्र, प्रत्येकाला संधी देणं शक्य नाही. त्यामुळे ज्यांना संधी मिळाली नाही ते नाराज असणं स्वाभाविक आहे. पण त्यांची देखील नाराजी आम्ही दूर करू”. त्याचप्रमाणे, “आम्ही शिफारस यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली असून येत्या १५ दिवसांत निर्णय घेण्याची विनंती केली आहे” असे म्हणत “लवकरच राज्यपाल यादीला मंजुरी देतील” असा विश्वासही यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

चंद्रकांत पाटलांवरही टीका

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला टोला लागवताना जयंत पाटील म्हणाले कि, “घरात बसून चंद्रकांत दादांनी ट्विटकरून काय भूमिका व्यक्त केली. यावर प्रतिक्रिया देण्याची मला काहीही आवश्यकता वाटत नाही”. त्याचप्रमाणे, मराठा आरक्षणावर बोलताना जयंत पाटील म्हणाले कि, “आम्ही मराठा समाजाचं आरक्षण टिकावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे, महाविकासआघाडीने मराठा तरुणांचा विश्वासघात करण्याचा मुद्दाच नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं १००व्या वर्षात पदार्पण, राज ठाकरेंकडून खास शुभेच्छा!

News Desk

जाणून घ्या…शिंदे सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय

Aprna

स्टेअरींग अजित पवारांकडे असलं तरी गाड्या आम्ही पुरवतो-संजय राऊत

News Desk