HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा मुहूर्त ठरला!

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु होती. मात्र खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेशाचा घटस्थापनेचा मुहूर्त चुकल्यानंतर आता त्यांनी भाजप सोडत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची नवी वेळ निश्चित केली आहे. त्यानुसार एकनाथ खडसे गुरुवारी २२ ऑक्टोबरला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. खडसे यांच्या गोटात त्यादृष्टीने हालचालाही सुरु झाल्या आहेत. त्यासाठी खडसे समर्थकांना गुरुवारी मुंबईत जमण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजत आहे.

एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र, रक्षा खडसे भाजपमध्येच राहणार असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी या दोघांमध्ये चर्चा झाली होती. यानंतर रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती येत आहे.

या आधी एकनाथ खडसे हे घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. हा अंदाज चुकला होता. यानंतर खडसे यांनी ‘प्रसारमाध्यमांनीच माझ्या प्रवेशाचा मुहूर्त काढला होता, तो चुकला’, असे म्हटले होते. तर मी अजूनही भाजपमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले होते.

तर काल (१९ ऑक्टोबर) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशद्वार भाष्य केले आहे. ‘खडसे विरोधी पक्ष नेते होते तेव्हा ते आक्रमक आणि खूप सक्रिय होते. त्यांचं कर्तव्य मोठं आहे. राजकीय निर्णय काय घ्यावा तो त्यांचा प्रश्न आहे. पण २० वर्षात विरोधात असताना खडसे सर्वात प्रभावी होते. मात्र, आता भाजपने त्यांनी नोंद घेतली नाही. त्यामुळे जिथे नोंद घेतली जाते तिथे जावे असे कदाचित खडसे यांना वाटत असावं’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शिवाजी पार्क’वरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही का?

Manasi Devkar

“मुलाच्या मतदार संघात ‘पावरी’ होत आहे आणि आमचे मुख्यमंत्री”

News Desk

“देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर राज्यात ड्रॅगचा खेळ सुरू” – नवाब मलिक

News Desk