पुणे | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल अनेक नेत्यांची प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यादी प्रवेशाबद्दल मला काहीही माहिती नाही, असा स्पष्ट खुलासा आज अजित पवार यांनी पुण्यात केला आहे. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी दिली आहे. पुण्यात अजित पवारांच्या हस्ते विधान भवन येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
“राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काही जण मला भेटून गेले. त्यामुळे भेट झाली म्हणजे काही काळंबेरं समजू नये. भाजपाचं सरकार असताना आम्हीदेखील लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना भेटायचो. मी तर सगळ्यांना भेटत असतो, तुम्ही मला कित्येक वर्ष ओळखता,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. खडसेंबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, “एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला दिली आहे”.
तसेच, ठाकरे सरकारने जलयुक्त शिवाराची चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. यावर अजित पवार यांनी होणाऱ्या आरोपांना उत्तर दिलं. ते म्हणाले की, “हे जाणुनबुजून करत नाही. कॅगच्या अहवाल दोन दिवसांच्या अधिवेशनात सादर करण्यात आला होता. कॅगच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. तशा पद्धतीच्या सूचना गेल्या आहेत”.
“सूडबुद्दीने किंवा मुद्दामून कोण कऱणार आहे? कॅगचा अहवाल कोणाच्या काळात आला? कारण नसताना राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. आम्ही विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हा जलसंधारण खातं ज्यांच्याकडे होतं त्या तानाजी सावंत यांनी विधानपरिषेदत भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं होते. त्यांनीच तसंच सूतोवाच केलं होतं,” असं अजित पवार यांनी सांगितले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.