HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील – ‘जन्माला यावे तर कर्नाटकात’

बेळगाव – ‘कर्नाटकात जन्मला आले तर जीवन धन्य होते’ असे राज्याचे महसूल मंत्री आणि समन्वयक मंत्री यांनी बोलून नाही तर चक्क गाणे गावून दाखविले. यामुळे सीमा भागात पाटील यांचा चांगला विरोध होत आहे. गेली अनेक वर्षापासून बेळगाव सीमा प्रश्न हा प्रलंबित आहे. पाटील यांना सीमा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने त्यांच्यावर समन्वयकाची जबाबदारी दिली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील गोकाकच्या तवग गावातील दुर्गादेवी मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी गेलेल्या कार्यक्रमात पाटील यांनी भाषणात या गाण्याची ओळ म्हटले. ‘हुट्टी दरे कन्नड नाडे हुट्टी बेकू’ असे या गाण्याचे बोल आहेत. कर्नाटकात जन्मला आले तर जीवन धन्य होते असे या ओळीचा अर्थ आहे. त्यामुळे सीमा भागात पाटील यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

पाटील यांनी सीमा भागातील हुतात्म्यांचा तसेच बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी लाठ्याकाट्यात खात ६० वर्षे संघर्ष करणाऱ्या मराठी भाषिकांचा अवमान केला आहे. तसेच महाराष्ट्र द्रोह ही केला असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे.

‘या कार्यक्रमाला बहुसंख्य कन्नड भाषिक होते. त्यामुळे त्या भाषेतूनच आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला. कन्नड भाषेतून आपण म्हटलेल्या त्या गाण्याच्या ओळी म्हणजे दुर्गा स्तुती होती. त्यावरुन एवढे वातावरण निर्माण करण्याचे कारणच नाही असे चंद्रकांत पाटील यांनी यावर स्पष्टीकर दिले. ’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवसेना आता शिवसेना राहिली नाही, ती भीवसेना झाली

News Desk

देवेंद्र फडणवीस माझ्याकडे १२-१८ तास राहायचे, खडसेंनी करुन दिली आठवण

News Desk

वैद्यनाथ साखर कारखान्याचे कोणतेही बॅक खाते जप्त झाले नाही, हा केवळ राजकीय खोडसाळपणा

News Desk
देश / विदेश

पेट्रोलचे दर गगणाला भिडल्याने सर्वसामान्याचे खिशे रिकामे

swarit

मुंबईः अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजपने लोकांचे खिसे मोकळे करण्याचा डाव रचल्याचे इंधनाच्या वाढीव दरावरून दिसून येत आहे. पेट्रोल दराने 80 रुपयांचा टप्पा पार केला असून यामुळे सर्वासामान्या नागिरकांच्या खिशाला झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये पट्रोलच्या दराने अंशी पार केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर प्रति बॅरेल 35 डॉलर इतके कमी असताना मोदी सरकारने इंधनाचे दर कमी करण्याऐवजी वाढवण्याचा धडाका लावला आहे. प्रत्येक महिन्याला दर कमी होण्याऐवजी ते वाढत चालले आहेत. याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना सोसावा लागत आहे.

Related posts

काश्मीरमध्ये २४ तासात ८ दहशतवाद्यांना कंठस्नान तर एक जवान शहीद

News Desk

“या चोऱ्यामाऱ्या करणं थांबवलं पाहिजे?”, राऊतांचं पेगॅससवर भाष्य

News Desk

ध्वजारोहण करून परतणाऱ्या विद्यार्थीनीवर बलात्कार

News Desk