HW News Marathi
मुंबई

विहिरीचा कठडा तुटून एका चिमुकलीसह दोन महिलांचा मृत्यू

मुंबई | विलेपार्ले येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी काही महिला मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रुईया बंगलो, दीक्षित रोड, सॅटेलाईट हॉटेलजवळ जमल्या होत्या. मात्र, या ठिकाणी पूजेचा कार्यक्रम सुरु असताना विहिरीचा कठडा तुटून विहिरीत काही महिला व मुले पडली. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस हजर झाले. विहिरीत पडलेल्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. जखमींना व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.

सदर दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. माधवी पांडे (वय – ४९), रेणू यादव (वय २०) आणि ३ वर्षीय दिव्या अशी मृतांची नावे आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. याबाबत विलेपार्ले पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काही महिला विलेपार्ले येथील रुईया बंगलो जवळील विहिरीवर असलेल्या लोखंडी जाळीवर बसून पूजा करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत सात महिलांना वाचविण्यात यश आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांनी केली शस्त्रांची पूजा

News Desk

स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही भ्रष्टाचार होऊ शकतो हे पहिल्यांदाच कळले !

News Desk

फेरीवाला संरक्षण कायदा त्वरित लागू करा – संजय निरुपम..

News Desk
महाराष्ट्र

…मग सभागृहात अंधार कसा ? | अजित पवार

News Desk

मुंबई | पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्यादिवशी विधानभवनातील कामकाज सकाळी १० वाजता सुरू झाले आहे. विरोधक मुख्यमंत्र्याच्या राजीनामा मागण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन करत होते. त्याचवेळी सभागृहाची बत्ती गुल झाली होती. सरकारच्या भोंगळ कारभाराबाबत सर्वच विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली.

पावसाळी अधिवेशन नागपूरला घ्यायचं की नाही यामध्ये सरकारने बराच वेळ घालवला आणि घ्यायचं ठरवल्यानंतर यंत्रणेला काम करायला वेळ मिळाला नाही. त्यानंतर हा आजचा खेळखंडोबा झालेला दिसत आहे. ही बाब निषेधार्य आणि चुकीची आहे, असे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. विशेष करुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातही लाईट नसल्याने त्यांनी मोबाईलच्या बॅटरीवर कागदपत्रांची पाहणी केली. सभागृहात लाईट नसल्याने अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

ऊर्जामंत्री सांगत आहेत लाईट आहे…लाईट आहे… मग सभागृहामध्ये लाइट का नाही… सबस्टेशनमध्ये लाइट का नाही. स्वत:विधानसभेच्या अध्यक्षांना येवून पाहणी करावी लागत आहे. ही काम त्या यंत्रणेची आहेत. परंतु त्या यंत्रणेला काम करण्यासाठी जो वेळ दयावा लागतो. तो वेळ दिला गेला नाही. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होते. मग पावसाळी अधिवेशन नागपूरला का हवे होते.

उपराजधानीत पावसात सभागृहाची इतकी अवस्था होते तर इकडे अधिवेशन घेण्याचा इतका हट्टाहास कशाला पाहिजे होता, असा सवाल करतानाच इथे पर्यायी व्यवस्थाही करण्यात आलेली नाही,जी आहे. तीपण एका तासाने जाईल असे सांगण्यात आले. अशाप्रकारचा गलथान कारभार पावसाळी अधिवेशनात चालला आहे. आजचं हे सरकारचं अपयश आहे .महाराष्ट्रातील जनतेने हे चित्र पहावे. विधानभवन परिसरात पाणी तुंबलेले दिसत आहे. त्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे असेही अजित पवार म्हणाले.

Related posts

राजभवनावर आजी-माजी मुख्यमंत्र्यांची टळली भेट!

News Desk

मुख्यमंत्री स्वत:चे कुटुंब सुरक्षित ठेवू शकले नाहीत!

News Desk

चाळीसगावची जागा २०२४ मध्ये यायलाच हवी – जयंत पाटील

News Desk