HW News Marathi
देश / विदेश

गोव्याचे माजी काँग्रेस प्रमुख शांताराम नाईक यांचे निधन

पणजी | माजी राज्यसभा सदस्य आणि माजी गोवा काँग्रेसचे प्रमुख शांताराम नाईक यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. नाईक यांना सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्याना मडगाव या त्यांच्या घराजवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

७३ वर्षीय शांताराम नाईक यांच्या अशा जाण्याने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या रुपाने आम्ही एक मार्गदर्शक गमवला आहे. नाईक यांनी अनेक युवकांना काँग्रेसमध्ये येण्यासाठी अमुल्य असे मार्गदर्शक केले होते. नाईक यांच्या जाण्याने गोवा काँग्रेसचे मोठ नुकसान झाले असल्याचे गोवा काँग्रेस नेता गिरीश राया यांनी सांगितले.

  • शांताराम यांचा अल्प परिचय

शांताराम नाईक यांनी गोवा काँग्रेस पार्टीच्या वतीने १९८४ मध्ये पहिल्यांदा लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले. नाईक यांनी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणी उचलून धरली होती. नाईक यांच्या पाठपुराव्याने गोव्याला १९८७ वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाला. २००५-२०११ आणि २०११-२०१७ या कालावधीत नाईक दोन वेळा राज्यसभा सदस्य देखील झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्ती, बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता !

News Desk

भारतात कोरोना ग्रस्तांची संख्या २८ वर, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती

swarit

ब्रिटनच्या गृहमंत्री पदी भारतीय वंशाच्या प्रीती पटेल

News Desk
महाराष्ट्र

एसटी महामंडळाला १५ कोटीचे नुकसान, कर्मचाऱ्यांचा आजही संप सुरुच

News Desk

मुंबई | उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेलेले लोक पुन्हा घरी परत येण्यासाठी एसटी बस उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढ मान्य नसल्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत.

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाला १५ कोटी रुपयाचा महसूल बुडाला आहे. एसटीच्या २५ हजार फेऱ्या रद्द झाल्या आहेत. दिवसभरात महाराष्ट्रातील २५० आगारातून सुमारे ३० टक्के बसेसच्या फेऱ्या सुटल्या, तर राज्यातील २५ आगार पूर्ण क्षमतेने चालू होते.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यात संपाचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवला. एसटी कर्मचाऱ्यांच्या अचानक संपावर गेल्यामुळे प्रवाशांचे आजही हाल होणार आहेत. त्यामुळे एसटी प्रशासाने कर्मचाऱ्यांवर कारवाई करत राज्यातील शेकडो कर्मचाऱ्यांचे निलंबन करुन संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.

संपावर जाण्याआधी कोणतेही अधिकृत पत्र कर्मचाऱ्यांनी दिले नाही. तर काही ठिकाणी कर्मचारी गैरहजर राहिले. संप करुन प्रवाशांना वेठीस धरणे चुकीचे असून कर्मचाऱ्यांना वेतन मान्य नसेल तर त्यांनी औद्योगिक न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असल्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी म्हटले आहे.

  • संबंधित बातम्या

एसटी संपाला भोकर तालुक्यात हिंसक वळण

एसटी कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर

Related posts

“राणेजी, बाळासाहेबांनी खोटं बोलणाऱ्यांना काढूनही टाकलेलं लक्षात असुदे”- मुख्यमंत्री

News Desk

खासदार सुप्रिया सुळे आता न्यूज अँकरींग करणार

swarit

Tauktae Cyclone : नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या, नसीम खान यांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं

News Desk