HW News Marathi
कृषी महाराष्ट्र राजकारण

राजू शेट्टींना सरकारकडून चर्चेचे निमंत्रण; चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित

कोल्हापूर – ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या (Sugarcane Producer Farmer) मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (Swabhimani Shetkari Sanghatana) आजचे चक्काजाम आंदोलन (Chakkajam Protest) स्थगित करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी याबाबत माहिती दिली आहे. मात्र, दोन वेळा सरकारने फसवणूक केली असून जर 29 नोव्हेंबरच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर 3 डिसेंबरला मोठ्या ताकदीने चक्का जाम करण्याचा निर्धार राजू शेट्टी यांनी केला आहे.

राज्यातील एकही महामार्ग (National Highway), राज्यमार्ग (State Highway) सुरु राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आता आरपारची लढाई असेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. शेट्टी यांना विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री (Chief Minister), उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) आणि सहकार मंत्री यांना 29 नोव्हेंबर रोजी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे शेट्टी यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. एक रकमी एफआरपी (FRP), ऑनलाईन वजन काटे तसेच गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचे दोनशे रुपये मिळावेत, वाहनधारक व मजूर महामंडळांमार्फत पुरवण्यात यावेत या मागण्यांसाठी स्वाभिमानीकडून एल्गार पुकारण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर येत असल्याने तसेच आंदोलनाच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जिल्हा पोलीस प्रशासनाने शेट्टी यांच्याशी चर्चा करून बैठकीसाठी नियोजन करण्यात आले व आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली.

दरम्यान, आंदोलन स्थगित केल्यानंतर राजू शेट्टी यांनी सांगितले की, “दिवसभर फोनवरून चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मागण्यांवर व्यापक बैठकीची आवश्यकता असल्याचे सांगितले व बैठकीत निश्चितच सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले. त्यांनी तातडीने सहकार मंत्र्यांच्या सहीने तातडीने मला पत्र पाठवले आहे. बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, साखर आयुक्त उपस्थित असतील. त्यांनी चक्का जाम मागे घेण्याची विनंती केली.”

“…तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही”

ऊस उत्पादक जागरूक शेतकरी असून चटके बसल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi) सगळे नियम रद्द केले, मग एक रकमी एफआरपी कायद्यात दुरुस्ती करण्याची संधी होती ती का करत नाही? कोल्हापुरात लढून एफआरपी घेतली मात्र इतर ठिकाणी शेतकऱ्यांना संघर्ष करून घ्यावी लागत आहे. ते इतर कारखान्यांना का जमत नाही? वाघ आहे की शेळ्या हे दाखवून देऊ. गेल्या वर्षीचा हिशेब घेतल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडीने केलेला कायदा मागे घेत नाही, काट्यांबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीवरून इंजेक्शन आणणं सुजय विखेंना पडले महागात, कोर्टात याचिका झाली दाखल

News Desk

“अण्णा हजारे इतके दिवस होते कुठे?” राज ठाकरेंचा सवाल

News Desk

राष्ट्रवादीच्या वाताहतीला राष्ट्रवादीच जबाबदार !

News Desk