HW News Marathi
महाराष्ट्र

‘मराठा आरक्षणा बाबत मोठी बातमी,’ राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार बहाल करण्याची तयारी!

१०२ या घटना दुरूस्तीनुसार राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नसल्याचा निकाल आता सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण ल प्रकरणात दिला होता. आता याच अनुषंगाने केंद्र सरकार संसदेत विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. इतर मागास वर्ग तयार करणे, त्यातील जातींची ओळख करणे आणि त्यांची वेगळी यादी करण्याचा अधिकार राज्यांचा आहे. तोच अधिकार अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकार आता संसदेचा मार्ग निवडत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भात विधेयक आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती आता समोर येत आहे.

यापूर्वी, एससी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर केंद्र सरकारनं संसदेत विधेयक आणून जुनी व्यवस्था पूर्ववत केली होती. आरक्षणासारख्या संवेदनशील प्रकरणात केंद्र सरकार कोणत्याही प्रकारचे धोका पत्करू शकत नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारताना, १०२ व्या घटना दुरुस्तीचा संदर्भ दिला होता. तसंच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी स्वतंत्र यादी तयार करण्याचा अधिकार राज्यांना नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आता हाच मुद्दा धरत मोठा गदारोळ निर्माण झाला होता. यावर आता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री विरेंद्र कुमार यांनी मंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्याबरोबर बैठक घेतली आणि संसदेत विधेयक आणण्यासाठी तयारी करण्याचे आदेशच अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नुसती ‘फडणवीसी’ करणारा माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय! – उद्धव ठाकरे

Aprna

MPSC परिक्षा रद्द केल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला – पंकजा मुंडे

News Desk

‘भाजपमधून बाहेर पडाल तर काय त्रास होतो हे दाखवायचं आहे’, भुजबळांचा भाजपवर वार

News Desk