HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची महापूजा करू देणार नाही | मराठा क्रांती मोर्चा

पंढरपूर | मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्द्यावर राज्य सरकारने कोणताच निर्णय न घेतल्यामुळे मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची पूजा न करू देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या राज्याव्यापी बैठकीत सोमवारी येथील श्रीराम मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

मराठा समाजाने राज्यभरात ५८ विशाल मोर्चे काढले, तरी सुद्धा सरकार आमची दखल घेत नसल्याचा आरोप या मराठा समाजाने या बैठकीत घेतला आहे. ‘आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मुख्यमंत्र्यांना आषाढीची महापूजा करू देणार नसल्याचे,’ मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजाभाऊ गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, छावा अशा संघटनांसह सर्वच पक्षातील मराठा समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, कोपर्डी घडनेतील अत्याचारित मुलीचे वडील बबन सुद्रीक, विवेकानंद बाबर, महेश डोंगरे, मिलिंद भोसले आदी उपस्थित होते.

Related posts

“मी स्वत: निराशावादी नाही आणि मी कोणालाही निराशावादी होऊ देणार नाही” – उद्धव ठाकरे

News Desk

राज्याला कर्तबगार मुख्यमंत्री हवा, राणेंची उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शंका

News Desk

महाडिक,नरके,मुश्रीफ ,मंडलीक घराण्यातल्या शिलेदारांचं गोकुळ निवडणुकीत काय झालं ?

News Desk
महाराष्ट्र

आजपासून १२ वीचे ऑनलाईन फॉर्म

News Desk

मुंबई | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. सरल प्रणालीच्या माध्यमातून अर्ज भरण्याची सूचना मंडळाने केली आहे. मंडळाने अद्यापही परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर केलेले नाही.

अर्ज भरण्यासाठी २१ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. त्यानंतर विलंबित शुल्कासह ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येतील. सरल प्रणालीमध्ये नोंद असणाऱ्या विद्यार्थ्यांचेच अर्ज वैध ठरणार असल्याने अकरावीमधील अनियमित प्रवेश समोर येणार आहेत.

mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज भरायचे आहेत. परीक्षेचे वेळापत्रक मात्र जाहीर केलेले नाही.

Related posts

बेस्टच्या सेवेत असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांना दररोज २२५ रूपये भोजनभत्ता देणार

News Desk

मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवून शिवसेनेचा माज उतरवू – देवेंद्र फडणवीस 

News Desk

मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी देत जयंत पाटील आणि धनंजय मुंडेंचा अडवला ताफा

News Desk