मुंबई | अयोध्या राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून सध्या देशासह राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या भूमिपूजन सोहळ्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे अयोध्या राम मंदिर हा शिवसेनेच्या जिव्हाळाच्या विषय असल्याने शिवसेनेची भूमिका काय असणार ? हा प्रश्न आहे. यातच आता राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चक्क एक सल्ला देण्यात आला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अयोध्या राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण आहे. मात्र, त्यांनी या सोहळ्याला जाणे टाळावे”, असा थेट सल्ला आता राष्ट्रवादीचे माजी खासदार माजिद मेमन यांनी दिला आहे.
Uddhav Thakrey is among invitees for bhoomi pujan of Ram Temple. He may participate respecting Covid 19 restrictions in his personal capacity. The head of a secular democracy should refrain from promoting a particular religious activity..
— Majeed Memon (@advmajeedmemon) July 21, 2020
“उद्धव ठाकरे यांना अयोध्या राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रण पाठविण्यात आले आहे. त्यामुळे, ते वैयक्तिकरित्या या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे पालन करून उद्धव ठाकरे पूर्णपणे आपल्या वैयक्तिक क्षमतेत या सोहळ्याला हजेरी लावू शकतात. मात्र, एका धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे प्रमुख या नात्याने त्यांनी कोणत्याही विशिष्ट धार्मिक कार्यक्रमाला चालना देणे टाळावे”, असे माजिद मेमन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या या सल्ल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.