HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

शरद पवारांना सरकार चालवण्याचा दांडगा अनुभव ,सामनातून राष्ट्रवादीचे कौतुक तर काॅंग्रेसवर टीका

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यात महाविकासआगाडीतील काँग्रेसमध्ये धुसपूस सुरू आहे. सामनाच्या आजच्या (१६ जून) अग्रलेखात काँग्रेस राजकारणातील ही जुनी खाट महाराष्ट्रात कुरकुरू का लागली आहे? असा उल्लेख केला आहे. काँग्रेसमधील कुरकुरत्या खाटेवरचे हे दोन मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचे म्हणणे मांडणार आहेत. मुख्यमंत्री त्यांचे म्हणणे ऐकतील व निर्णय घेतील. शरद पवार व त्यांच्या पक्षाच्या लोकांपाशीही दांडगा अनुभव आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केले आहे.

दरम्यान, “काँग्रेसमधील कुरकुरत्या खाटेवरचे हे दोन मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचे म्हणणे मांडणार आहेत. मुख्यमंत्री त्यांचे म्हणणे ऐकतील व निर्णय घेतील. थोरात व चव्हाण हे काँग्रेसचे अनुभवी नेते आहेत व त्यांना सरकार चालविण्याचा दांडगा अनुभव आहे. मात्र त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, असा दांडगा अनुभव शरद पवार व त्यांच्या पक्षाच्या लोकांपाशीही आहे. तथापि कुरकुर व कुरबुर होताना दिसत नाही,” असे म्हणत सामनात काँग्रेसवर  करत टीका केली आहे.

संबंधित बातम्या

राजकारणातील जुनी खाट ‘काँग्रेस’ महाराष्ट्राच्या राजकारणात का कुरकुरतेय ?

 

 

Related posts

“बेळगावमध्ये शिवरायांचा पुतळा काँग्रेस नेत्याने हटवलाय, शिवसेना राजीनामा देणार का ?”

News Desk

धारावीत २५ नवे कोरोनाबाधित, एकूण आकडा १३७८ वर

News Desk

वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील, राज्य सरकारचा निर्णय

News Desk