HW News Marathi
महाराष्ट्र

‘मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादी नाराज’, शिवसेना खासदार संजय राऊत ठाकरे यांच्या भेटीला!

मुंबई। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी औरंगाबादेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपबाबत भावी सहकारी असं वक्तव्य केलं. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीतच मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादीमध्ये नापसंती असल्याची चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबादमधील कार्यक्रमात भाषणाची सुरुवातच भाजपला ऑफर देत केली होती. मुख्यमंत्री म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आलो तर भावी सहकारी असा उल्लेख केला होता. मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ गुगलींने सगळेच अवाक् झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर महाविकास आघाडीत पडसाद उमटत असल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीमध्ये नापसंती असल्याची चर्चा आहे. संजय राऊत हे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा काही निरोप घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले आहेत का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

अशा वक्तव्यांची गरज काय?

महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबादेत केलेल्या विधानावर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीच नापसंती व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. पवार यांनी शिवसेनेच्या नेत्यांकडे नापसंती व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती मिळतेय. महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल असताना अशा वक्तव्यांची गरज काय? असा सवाल पवार यांनी केल्याचं सूत्रांकडून कळत आहे.

मुख्यमंत्री काल औरंगाबादमध्ये काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच भाजपला ऑफर देत केली. मुख्यमंत्री म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘प्रशासनाचा दरार नसेल तर अधिकाऱ्यांवर हल्ले होतात’ – जितेंद्र आव्हाड

News Desk

उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियतेवर भाजपची खोचक टीका, म्हणाले……

News Desk

तीन तलाक कायद्याच्या विरोधात जिल्हाअधिकारी कार्यलयावर मोर्चा

swarit