HW News Marathi
Covid-19

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनावर केली यशस्वी मात

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून आज (२२ जून) त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. धनजंय मुंडेंना १२ जूनला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होती. यानंतर धनंयज मुंडेंना श्वास घेताना त्रास जाणवत होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

धनंजय मुंडे यांचा . दुसरा रिपोर्ट आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देणार आहेत. मात्र नियमानुसार पुढील १४ दिवस धनंजय मुंडे यांना होम क्वारंटाईन राहावे लागेल. धनंजय मुंडें यांच्यासह स्वयंपाकी, मदतनीस अशा पाच जणांचा समावेश होता. धनंजय मुंडे यांच्यासह सर्वांवर उपचार करण्यात आले. दिलासादायक म्हणजे धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हेदेखील काही दिवस होम क्वारंटाईन झाले होते.

संबंधित बातम्या

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

धनंजय मुंडेंच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी होम क्वारंटाईन राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

धनंजय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी सेल्फ क्वारंटाईन

धनंजय मुंडेंच्या संपर्कात आलेल्या ३४ जणांपैकी १ जण पॉझिटिव्ह

धनंजय मुंडेंचे पीए,चालक कोरोनामुक्त ! मुंडेंसुद्धा दोन दिवसांत कोरोनामुक्त होतील…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील कोरोना टेस्टिंग लॅब्सची संख्या ४० वरून ६० करण्याचा प्रयत्न !

News Desk

राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर सर्वाधिक

News Desk

आषाढी वारीचे स्वरुप कसे असणार यावर आज चर्चा होणार

News Desk