HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्या म्हणजे केवळ अफवाच !

मुंबई | आगामी विधानसभा निवडणूक आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना-भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. छगन भुजबळ यांनी आता अखेर यावरचे आपले मौन सोडले आहे. “मी मांजरपाडा जलपूजन करत आहे. म्हणूनच त्यावरून लक्ष हटविण्याचा हा प्रयत्न आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु होती. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले कि, “मी योग्य वेळी यावर भाष्य करेन. ही केवळ एक राजकीय खेळी आहे. या निव्वळ अफवा आहेत.” दरम्यान, छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “आधी आताचे पाहूया. नंतरचे नंतर बघू”, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी या चर्चांवर फारसे भाष्य करणे टाळले आहे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

रामनाथ कोविंद यांचा उद्धव ठाकरेंना

News Desk

आमिर खान मतदान केलाच नाही

News Desk